म्युनिसिपल कामगार सेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:38 PM2017-12-14T23:38:12+5:302017-12-15T00:21:39+5:30
म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. यावेळी ४० मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. प्रलंबित मागण्यांसंदर्भात महिनाभरात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास दि. १७ जानेवारी २०१८ पासून ‘काम बंद’ आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी दिला.
नाशिक : म्युनिसिपल कर्मचारी-कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. यावेळी ४० मागण्यांचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले. प्रलंबित मागण्यांसंदर्भात महिनाभरात सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास दि. १७ जानेवारी २०१८ पासून ‘काम बंद’ आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी दिला. कामगार सेनेच्या वतीने यावेळी आयुक्तांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात प्रामुख्याने, आस्थापना परिशिष्टावरील अधिकारी व कर्मचाºयांना शंभर टक्के पदोन्नती मिळावी, वय वर्षे ४५ची अट व शैक्षणिक अट शिथिल करून कुंठित वेतनश्रेणी देण्यात यावी, वैद्यकीय भत्त्याच्या वाढीसंदर्भात महासभेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी, रिक्त पदे व सफाई कर्मचाºयांची पदे तत्काळ भरावी, गणवेशप्राप्त कर्मचाºयांना स्वेटर, बूट देण्यात यावे, ठेकेदारी पद्धत बंद करावी, हजेरी शेडवर आसन व इतर सुविधा पुरवाव्यात, सफाई कामगारांची दर सहा महिन्यांनी आरोग्य तपासणी करावी, मयत कर्मचाºयांच्या वारसांना तातडीने अनुकंपा तत्त्वावर मनपा सेवेत सामावून घ्यावे, कर्मचाºयांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम पूर्वीप्रमाणेच मिळावी, सुरक्षा रक्षक व वाहनचालकांच्या रिक्त जागा आउटसोर्सिंगने भरू नयेत, अपंग कर्मचाºयांच्या मागण्यांची पूर्तता करावी, आगामी अंदाजपत्रकात सातवा वेतन आयोग व त्याचा देय असलेल्या फरकाच्या रकमेची तरतूद करावी आदींसह विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी सरचिटणीस सुरेश अहेर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. याचवेळी निवेदन महपौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनाही देण्यात आले.
डिसेंबरअखेर बैठक
म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी चर्चा केल्यानंतर आयुक्तांनी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांप्रश्नी डिसेंबरअखेर बैठक घेण्याचे आश्वासित केले. प्रशासनाने महिनाभरात मागण्यांची पूर्तता न केल्यास ‘काम बंद’ आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.