हमाल खून प्रकरण; संशयित फरार

By Admin | Published: March 6, 2017 01:08 AM2017-03-06T01:08:12+5:302017-03-06T01:08:29+5:30

पंचवटी : घराकडे परतणाऱ्या दीपक दगडू अहिरे (३१) या हमालाचा चार ते पाच मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याची घटना शनिवारी घडली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले आहे.

Murder case; Suspected absconding | हमाल खून प्रकरण; संशयित फरार

हमाल खून प्रकरण; संशयित फरार

googlenewsNext

 पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील काम आटोपून घराकडे परतणाऱ्या दीपक दगडू अहिरे (३१) या हमालाचा चार ते पाच मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याची घटना शनिवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत़ दरम्यान, या प्रकरणी मयत दीपकचे वडील दगडू सोपान अहिरे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाली व्यवसाय करणारा दीपक अहिरे हा काम आटोपून दुचाकीवरून घराकडे (एमएच १५ सीएच ६३७३) परतत असताना चार ते पाच मारेकऱ्यांनी बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल उत्तम हिरा समोर अडवून धारदार शस्त्राने पाठीवर वार केले़ यामध्ये वर्मी घाव लागल्याने गंभीर जखमी झालेला दीपक हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित फरार झाले़
या घटनेनंतर पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ तसेच परिसरातील दुकानाबाहेर बसविलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासणी केली होती.
दीपक अहिरे याचा संशयितांनी खून का केला याचे कारण समोर आले नसून मारेकऱ्यांना जेरबंद केल्यानंतरच या खुनाचे गूढ उकलणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या खून प्रकरणात काही संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Murder case; Suspected absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.