लासलगावजवळ शेळी व्यापाऱ्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2022 10:51 PM2022-04-07T22:51:28+5:302022-04-07T22:52:51+5:30
लासलगाव : कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील अल्लाउद्दीन शमशुद्दीन खाटीक (५२) या शेळी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचा मृतदेह लासलगाव पोलीस कार्यालयाच्या हद्दीतील देवगाव-कानळद रस्त्यावर गुरुवारी (दि. ७) दुपारी झाडाझुडपांजवळ आढळून आला. सदर व्यापाऱ्याचे पाय बांधून खून करत कुणीतरी मृतदेह फेकून दिला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या लगत अल्लाउद्दीन शमशुद्दीन खाटीक या व्यापाऱ्याचा मृतदेह पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या व्यापाराचा कोणीतरी खून करून या ठिकाणी मृतदेह फेकून दिला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती समजताच लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रामकृष्ण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठुळे, हवालदार धोक्रट, कैलास महाजन यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नाशिकच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाडचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे यांनीदेखील भेट देऊन पाहणी केली. लासलगाव पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवचिकित्सेसाठी पाठविला असून खुनाचे नेमके कारण काय याबाबत पोलीस यंत्रणा तपास करत आहे.
सोबत होते बारा लाख रुपये
शेतकरी राजेंद्र रंगनाथ बोचरे यांना दुपारी १२.३० च्या सुमारास मोटारसायकल उभी आढळली. त्यांनी नजीक जाऊन बघितले असता त्यांना शेतात मृतदेह आढळून आला. सदर इसमाचा पाय बांधलेले व गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. अधिक चौकशीअंती तो मृतदेह अल्लाउद्दीन समसुभाई खाटीक यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यां सकाळी ते निफाडहुन कानळदकडे येत असताना त्यांच्याकडे १२ लाख रुपयांची रक्कम असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मृतदेहाची फॉरेन्सिक तपासणी व परिसराची श्वान पथकाने तपासणी केली असून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.