दगडाने डोके ठेचून अज्ञात व्यक्तीचा खून; होळकर पुलाखालची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2024 03:51 PM2024-03-10T15:51:38+5:302024-03-10T15:52:14+5:30

शहरात खुनाचे सत्र सुरूच

Murder of an unknown person by crushing his head with a stone; Incident under Holkar bridge | दगडाने डोके ठेचून अज्ञात व्यक्तीचा खून; होळकर पुलाखालची घटना

दगडाने डोके ठेचून अज्ञात व्यक्तीचा खून; होळकर पुलाखालची घटना

-संदीप झिरवाळ

पंचवटी : होळकर पुलाखाली उतरण्यासाठी असलेल्या पायरी जवळ मनपा शौचालय लगत एका फिरस्त्या व्यक्तीच्या डोक्यात कोणीतरी मारेकऱ्यांनी अज्ञात कारणावरून दगड घालून खून केल्याची घटना रविवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेत ठार झालेला व्यक्ती हा फिरस्ता असून त्याचा खून कोणी व का केला? याचे कारण गुलदस्त्यात आहे. कदाचित खून झालेला व्यक्ती व संशयित आरोपी यांच्यात काहीतरी कारणावरून किंवा दारूच्या नशेत वाद झाला असावा आणि त्यातूनच ही घटना घडली असावी अशी शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तविली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी रविवारी (दि.१०) सकाळी होळकर पुलाखाली असलेल्या पायरी जवळ एक अज्ञात व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याबाबत काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी जवळच असलेल्या मालेगाव स्टॅंड पोलिस चौकीत धाव घेत पोलिसांना माहिती कळविली. घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, नंदन बगाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर, हवालदार दत्तात्रय शेळके आदिंसह पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ होळकर पुलाखाली धाव घेतली असता एक ४५ ते ५० वर्षीय वयोगटातील व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

पहाटेच्या सुमाराला कोणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात दगड किंवा पेव्हर ब्लॉक मारल्याने वर्मी घाव लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. होळकर पुलाला लागून असलेल्या दुकानांचे व मालेगाव स्टॅंड परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले असून त्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून त्यात मयत व्यक्ती घटना घडण्यापूर्वी कोणा संशयितांबरोबर येजा करतांना दिसतो आहे का याचा शोध पोलिस घेणार आहेत. या खून प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Murder of an unknown person by crushing his head with a stone; Incident under Holkar bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक