मोदी यांचा अनैतिक प्रेमसंबंधांच्या वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 11:14 PM2022-03-19T23:14:18+5:302022-03-19T23:14:40+5:30

वाडीवऱ्हे : मुंबई-आग्रा महामार्गावरील पाडळी शिवारातील उंट ओहळ पुलाच्या खाली पाच दिवसांपूर्वी आढळून आलेल्या घोटी येथील महावीर कुबेर मोदी (५३) या इसमाच्या मृतदेहाबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याची उकल करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. मोदी यांचा खून त्यांच्या मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुलीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या गोंदेदुमाला ता. इगतपुरी येथील अजय संजय भोर (२४) यास पोलिसांनी अटक केली असून संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Murder of Modi over immoral love affair | मोदी यांचा अनैतिक प्रेमसंबंधांच्या वादातून खून

मोदी यांचा अनैतिक प्रेमसंबंधांच्या वादातून खून

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्ह्याची उकल : संशयितास अटक, खुनाची दिली कबुली

वाडीवऱ्हे : मुंबई-आग्रा महामार्गावरील पाडळी शिवारातील उंट ओहळ पुलाच्या खाली पाच दिवसांपूर्वी आढळून आलेल्या घोटी येथील महावीर कुबेर मोदी (५३) या इसमाच्या मृतदेहाबाबत दाखल झालेल्या गुन्ह्याची उकल करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. मोदी यांचा खून त्यांच्या मुलीच्या प्रेमप्रकरणाच्या वादातून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुलीशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या गोंदेदुमाला ता. इगतपुरी येथील अजय संजय भोर (२४) यास पोलिसांनी अटक केली असून संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

महावीर कुबेर मोदी रा. इंदिरानगर, घोटी ता. इगतपुरी यांचा मृतदेह अत्यंत कुजलेल्या स्थितीत गेल्या १५ मार्च रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील उंट ओहोळ पुलाखाली आढळून आला होता. याप्रकरणी मोदी यांची मुलगी श्रीमती शीतल हनुमान माळी यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सदर मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले होते. ग्रामीण पोलिसांना कोणतेही पुरावे आढळून आले नसताना केवळ गोपनीय चौकशीच्या आधारे तपासाला सुरुवात केली. फिर्यादी व अन्य साक्षीदार यांच्या मोबाइलचे सीडीआर तपासून त्याच्या विश्लेषणातून पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले. त्यानुसार, पोलिसांनी संशयित आरोपी गोंदेदुमाला ता. इगतपुरी येथील अजय संजय भोर या मजुरी काम करणाऱ्या युवकास शिताफीने अटक केली आहे. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

डोक्यात दगड घालून खून
संशयिताने दिलेल्या कबुलीजबाबानुसार, महावीर कुबेर मोदी यांची मुलगी आणि संशयित अजय भोर हे एकाच कंपनीत काम करत होते. दोघांचे एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांची कुणकुण महावीर मोदी यांना लागली होती व त्यांनी या अनैतिक संबंधास विरोध दर्शवला होता. त्याचा राग येऊन भोर याने गेल्या १० मार्च रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्याच्या मोटारसायकलवर महावीर मोदी यांना घेऊन जात त्यांना पाडळी शिवारातील उंट ओहोळ पुलाजवळ नेले. या ठिकाणी मोटारसायकल थांबवून मोदी यांना पुलाच्या कठड्याजवळ घेऊन जात त्यांच्या कानाच्या मागील बाजूस काचेची बाटली मारली व त्यांच्या डोक्यात दगड टाकून पुलावरून खाली फेकून दिले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला दगड जप्त केला आहे.

सहा दिवस पोलीस कोठडी
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कविता फडतरे यांनी तपासात सहभाग घेऊन वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, उपनिरीक्षक राजू पाटील, पोलीस नाईक लहू भावनाथ, प्रवीण काकड, हवालदार मोरे, पवार, शिपाई खांडरे, निंबाळकर, मराठे, गायकवाड, मौले, कचरे या पथकाने तपास केला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे, गिलबिले, बहीरम यांचेही साहाय्य लाभले. संशयितास इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने भोर यास २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Web Title: Murder of Modi over immoral love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.