सिन्नर येथे परप्रांतीय महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:53 AM2019-09-22T01:53:36+5:302019-09-22T01:54:37+5:30

सिन्नर येथील सरदवाडी रस्त्यावर संजीवनीनगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय परप्रांतीय महिलेचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून झाल्याची घटना शनिवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली.

The murder of a regional woman at Sinnar | सिन्नर येथे परप्रांतीय महिलेचा खून

सिन्नर येथे परप्रांतीय महिलेचा खून

Next

सिन्नर : येथील सरदवाडी रस्त्यावर संजीवनीनगर येथे राहणाऱ्या २९ वर्षीय परप्रांतीय महिलेचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून झाल्याची घटना शनिवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सिन्नर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
रेखा दर्वेश मेहरा (२९) रा. भोपाळ, हल्ली रा. सिन्नर हे मृत महिलेचे नाव आहे. संजीवनीनगर भागात गिरीश शिरसाट यांच्या खोलीत भाडेतत्त्वावर दर्वेश मेहरा नामक परप्रांतीय कामगार पत्नी व मुलीसह राहतो. दर्वेश शुक्रवारी चौथ्या इयत्तेत शिकणाºया मुलीला शाळेत सोडून आला. त्यानंतर अकरा वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून तो गेल्याचे समजते. त्यांची मुलगी सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर घरी आली.
घराला कुलूप असल्याने तिने खोली मालकाकडे चौकशी केली. मात्र त्यांना माहिती नसल्याने मुलगी जवळच राहणाºया ओळखीच्यांकडे गेली. त्यांनी चौकशी केल्यानंतर सायंकाळी उशीरापर्यंत घर उघडले गेले नव्हते. त्यामुळे शुक्रवारी रात्रभर मुलगी त्यांच्याकडे राहिली. शनिवारी सकाळीही घराला कुलूपच होते. त्यामुळे कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता बाथरुममध्ये रेखा मेहरा यांचा मृतदेह आढळून आला. अज्ञात व्यक्तीने गळा आवळून त्यांचा खून केल्याचे उघडकीस झाले.
सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पती दर्वेश मेहरा याचा तपास नाही. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The murder of a regional woman at Sinnar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.