पैशांच्या वादातून जन्मदात्याकडूनच पुत्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:15 AM2021-05-18T04:15:08+5:302021-05-18T04:15:08+5:30

मालेगाव : सेवानिवृत्तीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मुलाच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून करणाऱ्या पित्यासह अन्य दोघा जणांविरूद्ध ...

Murder of a son by the birth mother over a money dispute | पैशांच्या वादातून जन्मदात्याकडूनच पुत्राचा खून

पैशांच्या वादातून जन्मदात्याकडूनच पुत्राचा खून

Next

मालेगाव : सेवानिवृत्तीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मुलाच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून करणाऱ्या पित्यासह अन्य दोघा जणांविरूद्ध छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या तीन तासात संशयित आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी मानवी हितेश बाविस्कर यांनी फिर्याद दिली आहे.

मृत हितेश कृष्णा बाविस्कर (३४) रा. तिरुपती काॅलनी, शिवरोड, दाभाडी शिवार यांना त्यांचे वडील कृष्णा पौलाद बाविस्कर यांच्याकडे सेवानिवृत्तीच्या पैशांमधून दोन लाख रुपये मुलीच्या नावावर टाकण्याचे कबूल केले होते. कबूल केलेले पैसे मागण्यासाठी हितेश बाविस्कर हे गेले असता कृष्णा बाविस्कर व सुलोचनाबाई दिलीप अहिरे, अजय दिलीप अहिरे तिघे रा. दाभाडी शिवार यांनी धारदार हत्याराने गंभीर मारहाण करुन जीवे ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या खून प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. के. आखाडे, पोलीस हवालदार रवीराज गवंडी, नितीन बाराहाते, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, वासुदेव नेर पगार, संजय पाटील, सचिन अहिरे, राजेश मोरे आदिंनी केला.

Web Title: Murder of a son by the birth mother over a money dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.