खूनप्रकरणी संशयितांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 08:42 PM2020-06-23T20:42:28+5:302020-06-23T20:43:03+5:30

लासलगाव : येथून जवळच असलेल्या पिंपळगाव नजीक येथे गेल्या मंगळवारी (दि.१६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास इंदिरानगर येथील माळीबाबा रस्त्यावर वाहनचालक चेतन बाळू बैरागी या तरुणाचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी साहिल शेखसह एकूण आठ आरोपींना निफाड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Murder suspects in judicial custody | खूनप्रकरणी संशयितांना न्यायालयीन कोठडी

खूनप्रकरणी संशयितांना न्यायालयीन कोठडी

Next
ठळक मुद्देआठही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लासलगाव : येथून जवळच असलेल्या पिंपळगाव नजीक येथे गेल्या मंगळवारी (दि.१६) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास इंदिरानगर येथील माळीबाबा रस्त्यावर वाहनचालक चेतन बाळू बैरागी या तरुणाचा खून झाला होता. या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी साहिल शेखसह एकूण आठ आरोपींना निफाड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आरोपींना वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस. बी. काळे यांच्यासमोर तपास अधिकारी व लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी उभे केले असता या आठही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायाधीशांनी सुनावली आहे. यातील साहिल शेख, फिरोज अकबर शहा, इम्रान सलीम सय्यद, रोहित संजय शिरसाठ, कृष्णा बाळासाहेब वर्पे, अरुण किरण माळी, नितीन ऊर्फराजू अंबादास राजुर्डे, दत्तू बाळू जाधव या आठ जणांना पोलिसांनी अटक केली केली आहे. कोरोनाच्यामुळे संचारबंदी लागू असतानाही पिंपळगाव नजीक येथे भर रस्त्यावर साहिल शेख या मुख्य आरोपीचा वाढदिवस त्याचे १० ते ११ मित्र साजरा करीत असताना गाडीचा हॉर्न वाजविण्याच्या रागातून चेतन बाळू बैरागी याचा चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना घडली होती.

Web Title: Murder suspects in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.