तिबेटियन मार्केट येथील खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:06 AM2019-01-18T01:06:55+5:302019-01-18T01:07:54+5:30

पाप्या शेरगीरच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याचा भाऊ हरिश राजू शेरगील ऊर्फ हऱ्या (२२, रा.फुलेनगर), ललित सुरेश राऊत ऊर्फ लल्या (१९ दोघे रा. फुलेनगर) यांच्यासह चार विधीसंघर्षित बालकांनी चेतन पवार (१७) याच्यावर तिबेटियन मार्केटमध्ये सशस्त्र हल्ला करून खून केल्याची घटना १९ आॅगस्ट २०१७ घडली होती. या खून खटल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी (दि,१७) सुनावली.

The murder of the Tibetan market has given life to both | तिबेटियन मार्केट येथील खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

तिबेटियन मार्केट येथील खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

Next

नाशिक : पाप्या शेरगीरच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याचा भाऊ हरिश राजू शेरगील ऊर्फ हऱ्या (२२, रा.फुलेनगर), ललित सुरेश राऊत ऊर्फ लल्या (१९ दोघे रा. फुलेनगर) यांच्यासह चार विधीसंघर्षित बालकांनी चेतन पवार (१७) याच्यावर तिबेटियन मार्केटमध्ये सशस्त्र हल्ला करून खून केल्याची घटना १९ आॅगस्ट २०१७ घडली होती. या खून खटल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी (दि,१७) सुनावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पाप्या शेरगीर याच्या खून खटल्यात संशयित विधीसंघर्षित बालक चेतन पवार यास २०१७ साली फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी चेतनसमवेत शहरातून मुळ गावी डहाणू तालुक्यातील मूळ गाव दुबलपाड्याला स्थलांतर केले.
न्यायालयाच्या सुनावणीसाठी आई-वडिलांनी चेतनला १९ आॅगस्ट २०१७ रोजी शहरात आले होते.




या आरोपींनी अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने सशस्त्र हल्ला चढवून चेतनला ठार मारल्याचे फिर्यादित म्हटले आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक विलास शेळके यांनी करत विविध सबळ पुरावे न्यायालयापुढे सादर केले. सरकारपक्षाकडून अ‍ॅड. रवींद्र निकम यांनी युक्तिवाद केला. फिर्यादी चेतनचे वडिलांसह पंच, साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून करण्यात आलेला युक्तिवाद व सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हºया, लल्या यांना दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
—इन्फो-
आई-वडिलांसमोर केले ठार
चेतन यास वडील संजय रामलाल पवार व आई सविता पवार यांनी तिबेटियन मार्केट येथे कपडे खरेदीसाठी घेऊन गेले. यावेळी चेतन व त्याचा भाऊ स्वप्नील हे एका दुकानात कपडे बघत होता तर त्याचे आई-वडील जवळच टपरीवर चहा घेत होते. या दरम्यान, हºया व लल्या यांनी हल्ला चढविला. हल्ल्यातून चेतन पळून जाण्यास यशस्वी झाला असता काही अंतरावर पुन्हा त्याचा पाठलाग करून चेतनला खाली पाडून शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चेतनला त्याच्या आई-वडिलांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

Web Title: The murder of the Tibetan market has given life to both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.