चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:25+5:302021-01-20T04:15:25+5:30
----------------------- पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार मालेगाव : मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर दहीवाळ शिवारात पिकअप व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन ...
-----------------------
पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
मालेगाव : मालेगाव चाळीसगाव रस्त्यावर दहीवाळ शिवारात पिकअप व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अब्दुल्ला फैसल चाऊस(१८, रा मूनसीबीननगर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी फैसल चाउस सलाम चाउस यांनी फिर्याद दिली आहे. चाळीसगावकडून मालेगावकडे येणाऱ्या पिकअप (एम एच ०२ एक्सए ४१५७) वरील चालकाने ( पूर्ण नाव माहीत नाही) दुचाकी (एम एच ०३ डी एफ ०२८१)ला समोरा समोर धडक दिली. या धडकेत अब्दुला याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात पिकअप चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------------
विवाहितेचा छळ करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : व्यवसायासाठी माहेरून ५० हजार रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह दोघांविरुद्ध कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी करुणा प्रितेश दायमा या विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती प्रितेश आशोक दायमा, सासू वैजयंती अशोक दायमा, सासरा अशोक लक्ष्मीनारायण दायमा (सर्व राहणार कन्हैयानगर, जालना) यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास हवालदार आर्य सोनवणे करीत आहेत.
--------------------
मालेगावातून तीन दुचाकी लंपास
मालेगाव : शहरातील छावणी व कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीचे सत्र कायम आहे. मंगळवारी पुन्हा तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. येथील सटाणारोडवरील कापड दुकानाबाहेर लावलेली २० हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच ४१ एके ८३३२) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी पंकज नेमीचंद आसेरी यांनी फिर्याद दिली आहे. येथील हिंदू जिमखानापासून दुचाकी (एमएच ४१ वाय ३७०६) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी अमित काळू ठाकरे (रा.सोयगाव) यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या दोन्ही दुचाकी चोरीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे हे करीत आहेत, तर कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉलेजरोडवरील एका रुग्णालयाच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने ७५ हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच४१ एपी ७३५२) ही चोरून नेली आहे. याप्रकरणी विवेक शरद शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. देशमुख हे करीत आहेत.