कुºहाडीने वार करत महिलेचा खून; संशयितांना पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 09:56 PM2020-06-12T21:56:33+5:302020-06-13T00:12:37+5:30
मेशी : तालुक्यातील देवपूरपाडे येथील चिंचमळा शिवारात युवकाने कुºहाडीने वार करून महिलेचा खून केल्याची घटना घडली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य युवकाने त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने केल्याचे समजते.
मेशी : तालुक्यातील देवपूरपाडे येथील चिंचमळा शिवारात युवकाने कुºहाडीने वार करून महिलेचा खून केल्याची घटना घडली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य युवकाने त्याच्या कुटुंबीयांच्या मदतीने केल्याचे समजते. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयित युवकासह त्याच्या कुटुंबातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवपूरवाडे येथील शेतकरी विजय छबू जोंधळे हे कुटुंबीयांसह वस्तीवर राहतात, तर त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या संशयित अंकलेश गांगुर्डे (२०) या युवकाने गुरुवारी (दि. ११) पहाटे चोरी करण्याच्या उद्देशाने कुºहाड घेऊन जोंधळे यांच्या घरात प्रवेश केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय मातोंडकर, चंद्रकांत निकम, सुदर्शन गायकवाड करीत आहेत. दरम्यान, मुख्य संशयित अंकलेश गांगुर्डे यास कळवण न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
---------------------
वार केल्यानंतर लांबविले दागिने
भरझोपेत असलेल्या जिजाबाई जोंधळे (५१) यांच्या डोक्यावर कुºहाडीने वार केला. त्यात जिजाबाई यांचा मृत्यू झाला. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील जोडवे असा सुमारे पासष्ट हजारांचा ऐवज अंकलेशने काढून घेतला. यानंतर जिजाबाई यांचा मुलगा संदीप याला आवाज आल्याने त्याने दरवाजा उघडताच अंकलेश याने त्याच्याही डोक्यात कुºहाडीचा वार केला त्यात संदीप जबर जखमी झाला.
--------------------
झटापटीच्या आवाजाने संदीपची पत्नी राणी यांनी घराच्या मागील दरवाजाने आरडाओरडा केला. त्यांच्याही पोटात व पाठीत अंकलेशने कुºहाडीच्या दांड्याने घाव घातले. आरडाओरडा ऐकल्याने परिसरातील रहिवासी धावले व त्यांनी संशयित अंकलेशला पकडून बेदम चोप दिला.
त्याचवेळी संशयिताचे वडील अरु ण बाबूराव गांगुर्डे (५१), भाऊ कमलेश (२३) देखील शेतात पळत असताना स्थानिकांनी त्यांनाही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.