आपसातील वादातून कामगाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 03:16 PM2020-02-28T15:16:14+5:302020-02-28T15:16:26+5:30
वाडीव-हे : आपसातील वादातून सारूळ येथे कामगाराचा खून करण्यात आला आहे. विकास प्रेमसागर गोंड (१९, रा. महेरिया बाजार, जि. गोपाळगंज, बिहार) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
वाडीव-हे : आपसातील वादातून सारूळ येथे कामगाराचा खून करण्यात आला आहे. विकास प्रेमसागर गोंड (१९, रा. महेरिया बाजार, जि. गोपाळगंज, बिहार) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. वाडीवºहे पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सारूळ गावच्या शिवारात वैष्णवी खडी क्र ेशर येथे मंजेश यादव आणि विकास गोंड हे फॉकलॅण्डचालक म्हणून काम करत होते. दोघेही बिहार राज्यातील असून, गेल्या काही दिवसांपासून या दोघांत कुठल्याशा कारणावरून वाद सुरू होता. दोघे एकमेकांशी बोलतदेखील नव्हते मात्र दोन दिवसांपूर्वी दोन्ही मशीन शेजारी काम करत असताना विकास प्रेमसागर गोंड हा आपले मशीन बंद करून खाली उतरला. त्यानंतर शेजारच्या फोकलॅण्ड मशीनवर काम करत असलेल्या मंजेश यादव, रा. बिहार याने आपल्या ताब्यातील मशीनच्या बकेटने विकास यास धक्का देऊन गंभीर जखमी केले. यात विकास याच्या वर्मी मार लगल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी लखन लहांगे (ट्रकचालक) याने वाडीवºहे पोलिसांत भादंवि कलम ३०२ प्रमाणे फिर्याद दाखल केली असून, घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. खुनाचे नक्की कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने व आरोपी फरार असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती राणे,अतिरिक्त पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ अहिरे यांनी भेट देऊन तपासाकामी सूचना केल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ अहिरे, रूपेश मुळाणे करत आहेत.