साकोरा येथे एका युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 09:53 PM2020-06-30T21:53:57+5:302020-06-30T22:52:02+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावातील वांदरदेव चौफुलीवरील नांदगांव-वेहळगांव मुख्यरस्त्यावर मंगळवारी (दि.३०) सायंकाळी एका युवकाचा चाकूने भोसकुन खुन करण्यात आला. या प्रकरणी ३ व्यक्तींना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावातील वांदरदेव चौफुलीवरील नांदगांव-वेहळगांव मुख्यरस्त्यावर मंगळवारी (दि.३०) सायंकाळी एका युवकाचा चाकूने भोसकुन खुन करण्यात आला. या प्रकरणी ३ व्यक्तींना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पूर्व वैमश्यातून सदर घटना घडल्याचा अंदाज पोलीस सुञांनी वर्तिवला असून घटनास्थळी पो. उ. अधिक्षक समिरिसंग साळवे व नांदगांव पोलीसांनी तत्काळ दाखल झाले.
नांदगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकोरा गावातील वांदरदेव चौफुलीवर भाजीपाला बाजार भरतो शिवाय येथील वांदरदेव पारावर सतत नागरिकांची वर्दळ असते. याच ठिकाणी मयत विजय शंकर शिंदे (३०) रा. साकोरा याचे व संशयित आरोपींची पूर्व वैमन्यशावरु न वांदरदेव चौक साकोरा येथे जोरदार झटापटी झाल्या. त्यात विजयवर चाकूने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी होवून जागेवर गतप्राण झाल्याची घटना घडली. मात्र यावेळी उपस्थितीत नागरिकांनी बघ्याची भुमीका घेतली. घटनेची माहिती कळताच नांदगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक शिरोडकर, पोलिस उप निरीक्षक दळवी आदी घटनास्थळी त्वरीत दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमीस नांदगाव ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले असता, त्यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले.
या प्रकरणी गावानजिकच्या कोकणवाडा येथील एका महिलेसह दोन संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलिस उप अधिक्षक समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजु मोरे हे करीत आहेत.