मनमाडला बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 11:04 PM2021-08-21T23:04:57+5:302021-08-21T23:06:15+5:30

मनमाड : येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये रात्रीच्या वेळी बसण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणात एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. अवघ्या काही तासांतच संशयितांच्या मुसक्या आवळण्यात मनमाड पोलिसांना यश मिळाले.

Murder of a youth in a dispute over a seat in Manmad | मनमाडला बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात युवकाचा खून

मनमाडला बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात युवकाचा खून

Next
ठळक मुद्देट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मनमाड : येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये रात्रीच्या वेळी बसण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणात एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. अवघ्या काही तासांतच संशयितांच्या मुसक्या आवळण्यात मनमाड पोलिसांना यश मिळाले.
येथील गायकवाड चौकातील सुनील शंकर महाजन हा तरुण भाजी मार्केटच्या इमारतीत बसला होता. तेथे दुर्गप्रसाद उर्फ जग्गुदादा (रा. ईटारसी) आला व मी रोज या जागेवर बसतो. तू का बसला? असे म्हणत वाद घातला. याचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाले. संतापलेल्या दुर्गाप्रसादने खिशातून चाकू काढून सुनीलच्या अंगावर वार केले. यामध्ये रक्तबंबाळ झालेल्या सुनीलचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे व सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी रेल्वे स्थानकावरून संशयित आरोपी दुर्गाप्रसाद यास ताब्यात घेतले. दरम्यान, ज्योती शंकर महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मनमाड : येथील सपना हॉटेलसमोर भरधाव वेगाने जात असलेल्या मालट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात गणेश मालकवर या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजेंद्र ज्ञानदेव मालकर (रा. सोनारी, ता. कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनमाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Murder of a youth in a dispute over a seat in Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.