शेतीच्या वादातून उजनी येथे युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:56 PM2019-12-24T23:56:32+5:302019-12-24T23:58:08+5:30
सिन्नर : तालुक्यातील उजनी येथे शेतातील रस्त्याच्या कारणावरून चुलत भाऊ व पुतण्याने कुºहाड व काठ्याने मारहाण करून युवकाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी घडली. या घटनेत सात जण जखमी झाले असून पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिन्नर : तालुक्यातील उजनी येथे शेतातील रस्त्याच्या कारणावरून चुलत भाऊ व पुतण्याने कुºहाड व काठ्याने मारहाण करून युवकाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि.२४) सकाळी घडली. या घटनेत सात जण जखमी झाले असून पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील उजनी येथील सापनर कुटुंबीयात जमिनीच्या रस्त्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. त्याचे पर्यावसान जबर मारहाणीत होऊन त्यात अनिल त्र्यंबक सापनर (३६) या युवकाचा मृत्यू झाला. उजनी शिवारात कडवा चारीलगत शेत गट नंबर ५९/१ मध्ये सदर घटना घडली.
संशयित आरोपी मच्छिंद्र भागवत सापनर व किशोर मच्छिंद्र सापनर याने फिर्यादी त्याचा भाऊ व नातेवाईकास कुºहाड व लाकडाच्या दांड्याने जबर मारहाण केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
या मारहाणीत गंभीर जखमी अनिल सापनर यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत जाहीर केले. या घटनेत सुनील सापनर, आई रंगूबाई सापनर यांच्यासह सहा जण जखमी झाले आहेत.
जखमींवर सिन्नर व नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली. या घटनेत संशयित आरोपी मच्छिंद्र सापनर आणि किशोर सापनर हे देखील जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक माधव पडिले यांच्यासह पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासकामी सूचना दिल्या. यापूर्वीही सापनर कुटुंबात अनेक वेळा हाणामारीचे प्रकार झाले आहेत. मयत अनिल सापनर याचा भाऊ सुनील सापनर याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.