जेलरोडला युवकाचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:41 PM2018-08-22T22:41:04+5:302018-08-22T22:45:36+5:30

murder,jailroad,death,penalty,affiar,issu | जेलरोडला युवकाचा निर्घृण खून

जेलरोडला युवकाचा निर्घृण खून

googlenewsNext
ठळक मुद्दे एकलहरा गंगावाडी रस्त्यावरील घटना पोलिसांनी संशयित दिपक याला घेतले ताब्यात


लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : जेलरोडवरून एकलहरा गंगावाडीला जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी दुपारी युवकाच्या कुºहाडीने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. खुनाच्या गुन्ह्यातील संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालय जवळील भैरवनाथ नगर येथे राहाणारा संदीप वसंत मरसाळे (२९) याचा निर्घृण खून झाल्याचे तपासात निष्पण झाले. संदीप याचे अनैतिक संबध असल्याचा संशयावरून दिपक भगवान पगारे (३५) याने खून केल्याचे समोर आल्याने त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप व दिपक यांच्यात सतत वादविवाद व कुरबुरी होत होत्या. मयत संदीप याचे आई-वडिल मंगळवारी रात्री घराच्या परिसरातच शतपावली करीत असतांना दिपक त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर दुपारी दीड-पावणे दोनच्या सुमारास संशयित दिपक याने संदीप याला फोन करून झालेला वाद मिटवुन घेऊ असे सांगुन एकलहरा गंगावाडी रोडवरील उज्वला मंगल कार्यालयाजवळ बोलवले.
काही वेळातच संदीप हा मित्र अक्षय माधव बानाईत रा. भैरवनाथ नगर यांच्यासोबत मोटार सायकलवर (एमएच १५ डीएक्स १३०९) बसुन दिपला भेटावयास गेला. अगोदर पासूनच तयारीत असलेल्या दिपक याने संदीप समोर येताच त्याच्या डोक्यात कुºहाडीने सपासप तीन-चार वार केल्याने संदीप जागीच गतप्राण झाला. घटनेनंतर संशयित दिपक पगारे याने पलायन केले.
रस्त्यावरून येणाºया-जाणाºयांनी सदर घटनेची माहिती नाशिकरोड पोलिसांना देताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी सहकाºयांसह घटनास्थळी धाव घेतली.
तोपर्यंत घटनास्थळी गर्दी जमा झाली होती. पोलिसांना मयत संदीप यांची ओळख पटताच हा खुन अनैतिक संबंधाच्या कारणावरून झाल्याचे लक्षात आले. काही वेळातच पोलिसांनी संशयित दिपक याला ताब्यात घेतले. मयत संदीप हा जेलरोड दसक येथील ओमसाई मोटार ड्रायव्हींग स्कूलमध्ये गाडी शिकविण्याचे काम करीत होता. तर संशयित दिपक हा वाहन चालक म्हणून काम करीत आहे. याप्रकरणी अक्षय बानाईत याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित दिपक पगारे याच्याविरूद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: murder,jailroad,death,penalty,affiar,issu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.