इगतपुरी शहरासह तालुक्यात मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 10:45 PM2017-08-20T22:45:54+5:302017-08-21T00:22:57+5:30
पावसाचे माहेरघर असणाºया शहरासह तालुक्याच्या पश्चिम घाट पट्ट्यासह इगतपुरी शहर आणि कसाराघाट परिसरात रात्रीपासून मुसळधार व संततधार पाऊस झाला असून, गेल्या २४ तासांत ६५ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवार दि. २० अखेर ३ हजार ११० मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे.
इगतपुरी : पावसाचे माहेरघर असणाºया शहरासह तालुक्याच्या पश्चिम घाट पट्ट्यासह इगतपुरी शहर आणि कसाराघाट परिसरात रात्रीपासून मुसळधार व संततधार पाऊस झाला असून, गेल्या २४ तासांत ६५ मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. शहरासह तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवार दि. २० अखेर ३ हजार ११० मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली आहे. दरम्यान, तालुक्यातील भात लागवड केलेल्या शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान. संततधार होत असलेल्या पावसामुळे इगतपुरी शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहराच्या विविध भागात पाणी तुंबले असून, सगळीकडे पाणीच पाणी दिसून येत आहे़ इगतपुरी शहरातील रविवार बाजाराचा दिवस असल्याने पूर्णपणे बाजार ठप्प झाला होता. दरम्यान, मुसळधार पावसाची धार तुटत नसल्यामुळे धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. घोटी, इगतपुरी व परिसरात मुसळधार पाऊस झाला असून, संततधार पावसामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हा पाऊस रात्रीपासून आज उशिरापर्यंत सुरूच राहिल्याने याचा थेट परिणाम जनजीवनावर झाला आहे. दरम्यान, चोवीस तासांत घोटी शहरात ३५ मिमी तर धरण परिक्षेत्रात ४८ मिमी पाऊस, तसेच शहरात ६५ मिमी, दारणा धरण परिक्षेत्र व परिसरात ४३ मिमी, भावली धरण परिसरातही ३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसामुळे धरणसाठ्यांमध्येही भरीव वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली आहे़ इगतपुरी तालुक्यात गेल्या महिनाभरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे भात लागवड चांगल्या प्रमाणात झाली असून, आज अखेर तालुक्यात ९४ टक्के भात लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.