मुसळगाव पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 03:09 PM2020-08-18T15:09:19+5:302020-08-18T15:09:44+5:30

सिन्नर: गेल्या काही वर्षांपासून भाड्याच्या जागेत कामकाज सुरू असलेल्या मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पाठपुराव्यातून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या इमारत बांधकामासाठी ४ कोटी ४२ लाखांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी चालू आर्थिक वर्षात संभाव्य खर्चासाठी २ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे.

Musalgaon police station will get the right building | मुसळगाव पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळणार

मुसळगाव पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळणार

Next
ठळक मुद्दे सिन्नर: 4 कोटी 42 लाख निधी

सिन्नर: गेल्या काही वर्षांपासून भाड्याच्या जागेत कामकाज सुरू असलेल्या मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पाठपुराव्यातून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या इमारत बांधकामासाठी ४ कोटी ४२ लाखांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी चालू आर्थिक वर्षात संभाव्य खर्चासाठी २ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्वच विभागांची बांधकामे आणि इतर कामांवर बंदी घातली आहे. तसा आदेशही राज्य शासनाने पारित केला आहे. त्यामुळे सर्वच विभागांची कामे ठप्प झाली आहेत. असे असताना या निर्णयातून पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय इमारती तसेच पोलिस निवासस्थानाच्या इमारत बांधकामांना या निर्णयातून सूट मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी राज्य शासनाकडे विनंती केली होती. त्याची दखल घेत राज्य शासनाने राज्यातील पोलीस ठाणे पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या १४ विकासकामांसाठी मंजुरी दिली आहे. त्यात सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामाचा समावेश आहे. या कामासाठी ४ कोटी ४२ लाखांचा अंदाजित खर्च अपेक्षित असून २०२०-२१ या वित्तीय वर्षात या बांधकामासाठी २ कोटींच्या निधी खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी स्वप्निल बोरसे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश पारित झाला आहे. त्यामुळे मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: Musalgaon police station will get the right building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.