पोस्टर स्पर्धेत मुसळगाव शाळेचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:14 AM2021-04-07T04:14:15+5:302021-04-07T04:14:15+5:30

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन म्हणजे कर्करोगाला आमंत्रण हे तर अगदी सिगारेटच्या पाकिटावरदेखील लिहिलेले असते तरीही तरुणाईमधील व्यसनाधीनता वाढतच आहे. याच ...

Musalgaon School's success in poster competition | पोस्टर स्पर्धेत मुसळगाव शाळेचे यश

पोस्टर स्पर्धेत मुसळगाव शाळेचे यश

Next

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन म्हणजे कर्करोगाला आमंत्रण हे तर अगदी सिगारेटच्या पाकिटावरदेखील लिहिलेले असते तरीही तरुणाईमधील व्यसनाधीनता वाढतच आहे. याच दृष्टीने जाणीव-जागृती करण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये जाणीव जागृती व्हावी म्हणून सिव्हिल हॉस्पिटल नाशिकतर्फे ऑनलाइन पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आकर्षक बक्षिसे पटकावली. बक्षीस वितरण प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम शिंदे, आशा कार्यकर्त्या ललिता सोनवणे, लता जोंधळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सार्थक मोहन शिरसाठ, द्वितीय क्रमांक पटकावणारी पल्लवी नितीन शिरसाठ व तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्नेहा कुशवाहा यांचा स्कूल बॅग व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच शाळेतर्फे सहभागी विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस वितरण करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना पोस्टर स्पर्धेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या वैशाली सायाळेकर यांचाही शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. शालेय समितीचे अध्यक्ष आत्माराम शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी काढलेल्या तंबाखूमुक्त अभियान जनजागृती पोस्टरचे भरभरून कौतुक केले. मुख्याध्यापक वसंत गोसावी यांनी तंबाखूचे होणारे दुष्परिणाम प्रास्ताविकात सांगितले. वैशाली सायाळेकर यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी अनिता येवले, उषा चव्हाण, श्रावण वाघ, रोहिणी राजगुरू, स्वाती रोहोकले, नवनाथ हांडगे, कल्पना जगताप, अशोक कासार, रवींद्र चौरे, स्वाती येवले, विकास गुंजाळ, विशाखा वर्षे आदींचे सहकार्य लाभले. जिल्हा रुग्णालय नाशिकच्या वैद्यकीय अधिकारी उज्ज्वला पाटील यांचे या कार्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंखे, केंद्रप्रमुख हेमंत भुजबळ तसेच गट समन्वयक संदीप गीते यांनी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे व शाळेचे अभिनंदन केले.

फोटो : ०६ मुसळगाव१

तंबाखूमुक्त पोस्टर अभियानात यशस्वी ठरलेल्या मुसळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम शिंदे, आशा कार्यकर्त्या ललिता सोनवणे, लता जोंधळे आदी.

===Photopath===

060421\06nsk_12_06042021_13.jpg

===Caption===

तंबाखूमुक्त पोस्टर अभियानात यशस्वी ठरलेल्याा मुसळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या  सत्कारप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम शिंदे, आशा कार्यकर्त्या ललिता सोनवणे, लता जोंधळे आदी.

Web Title: Musalgaon School's success in poster competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.