पोस्टर स्पर्धेत मुसळगावचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:13 AM2021-04-11T04:13:57+5:302021-04-11T04:13:57+5:30
---------------------- मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सिन्नर : शासनाने सलग दुसऱ्या वर्षी रब्बी हंगामातील मक्याची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय ...
----------------------
मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी
सिन्नर : शासनाने सलग दुसऱ्या वर्षी रब्बी हंगामातील मक्याची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मका पिकाची नोंद असलेले शेतकरी ३० एप्रिलपर्यंत ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी मक्याची नोंदणी करू शकणार आहेत.
--------------------
वारेगावला वस्तूंचे वितरण
पाथरे - सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथे विविध योजनांचे लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या निधीतून अनुसूचित जाती-जमातीच्या चाळीस कुटुंबाना कुकरचे वाटप करण्यात आले. दिव्यांग कल्याण निधीतून पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रूपयांचा धनादेश देऊन अर्थसहाय्य करण्यात आले.
----------------
सिन्नरला मास्कचे वाटप
सिन्नर : पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मास्क वाटप उपक्रम राबविण्यात आला. सिन्नर आगारातील अधिकारी, कर्मचारी, वाहक आणि चालक यांना येथील जिल्हा क्षयरोग विभागातर्फे मास्कचे वाटप करण्यात आले.
-----------------
बसस्थानक परिसरात शुकशुकाट
सिन्नर : शासनाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सर्व आस्थापना बंद असल्याने नागरिकही घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात निरूत्साह दिसून आला.
-----------------
सोनांबेत युवा शेतकऱ्याने फुलवली स्ट्रॉबेरी
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील प्रयोगशील युवा शेतकरी विकास पवार यांनी स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे. प्रतिकुल हवामानावर मात करत २५ गुंठे जमिनीत लाल स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. त्यातून लाखोंचे उत्पन्नही मिळवले आहे.