मुसळदार पावसाने बंधारे ओसंडून वाहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 01:55 PM2019-06-27T13:55:47+5:302019-06-27T13:55:58+5:30

नांदगाव: हिसवळ परिसरात सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या मुसळदार पावसाने एकूण अकरा सिमेंट प्लग बंधारे ओसंडून वाहू लागले या पाण्यामुळे नाग्यासाक्या धरणातल्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हिसवळ खुर्द, हिसवळ बुद्रुक हिरेनगर,पानेवाडी भागात झालेल्या आजच्या पावसाने शेतात सगळीकडे पाणीच पाणी साचत असल्याचे दिसून आले.

  Muscular rains flank bunds | मुसळदार पावसाने बंधारे ओसंडून वाहिले

मुसळदार पावसाने बंधारे ओसंडून वाहिले

Next
ठळक मुद्देलेंडी नदीला त्यामुळे तुरळक स्वरूपात पाणी वाहिले. हे पूरपाणी बघण्यासाठी मोरझर च्या नागरिकांनी नदीपात्राकडे गर्दी केली. नांदगाव शहरातसुध्दा पावसाने हजेरी लावली. भालूरला सांयकाळी एका तासापेक्षा अधिक काळ जोरदार पजन्यवृष्टी झाली. जुन्या फरशी पुलावरून दीड फूट उ



नांदगाव: हिसवळ परिसरात सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या मुसळदार पावसाने एकूण अकरा सिमेंट प्लग बंधारे ओसंडून वाहू लागले या पाण्यामुळे नाग्यासाक्या धरणातल्या जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हिसवळ खुर्द, हिसवळ बुद्रुक हिरेनगर,पानेवाडी भागात झालेल्या आजच्या पावसाने शेतात सगळीकडे पाणीच पाणी साचत असल्याचे दिसून आले गेल्या अनेक वर्षात पहिल्याच कधीही न भरणारे बंधारे वाहू लागल्याने परिसरातील ग्रामस्थ आंनदी झालेत अशी प्रतिक्रि या बाजार समितीचे संचालक राजाभाऊ देशमुख यांनी दिली. असाच मुसळधार पाऊस वंजारवाडी परिसरात झाल्याने नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत. या पावसाने या भागातील सध्या सुरु असलेले पाण्याचे टँकर बंद होतील. या पाण्यामुळे विहिरींना पाणी उतरण्यास मदतच होणार आहेत. दीर्घकाळ पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नांदगाव शहर व परिसरात पावसाने अखेर हजेरी लावली या पावसाने शेतकरी सुखावला असून अजून दमदार पावसाच्या हजेरीची आवश्यकता व्यक्त होत आहे.
सलगतेने तीन वर्षाहून अधिक काळापासून तालुक्यात दमदार पाऊस झाला नसल्याने या पावसाने जनता आनंदित झाली आहे. मांडवड, लक्ष्मीनगर, मोरझर या भागात सांयकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मोरझरचा गाव नाला सात आठ वर्षात पहिल्यांदा खळाळून वाहू लागला.
फोटो ओळी
मोरझर:- सांयकाळी उशिरा आलेल्या पावसाने लेंडी नदीपात्र दुथडी भरून वाहू लागली (27 नांदगावलेंडी नदी)

 

Web Title:   Muscular rains flank bunds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.