पवार तबला अकादमीच्या वतीने संगीत महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 10:25 PM2019-09-17T22:25:58+5:302019-09-18T00:29:41+5:30
पवार तबला अकादमी संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नाशकात शुक्रवार, दि. २० पासून तीनदिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : पवार तबला अकादमी संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त नाशकात शुक्रवार, दि. २० पासून तीनदिवसीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी ६ वाजता या महोत्सवाचा प्रारंभ पवार तबला अकादमीचे विद्यार्थी तसेच पं. मकरंद हिंगणे यांच्या शिष्यांच्या गायनाने होणार आहे. शनिवारी, २१ सप्टेंबरला महोत्सवाला रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता प्रारंभ होणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तबलावादनानंतर ज्येष्ठ गायक पं. शंकरराव वैरागकर यांचे उपशास्त्रीय गायन होईल. रविवार, दि. २२ रोजी गौरव तांबे यांचे एकल तबलावादन, नृत्यगुरू रेखा नाडगौडा यांचे कथक नृत्य सादरीकरण होईल. कार्यक्र माची सांगता तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य पुण्याचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या स्वतंत्र तबलावादनाने होईल.त्यांना संवादिनीवादक अभिषेक शिनकर साथसंगत करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.