संगीतमय शिवचरित्र कथेस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:23 AM2019-02-18T00:23:43+5:302019-02-18T00:24:47+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे शिवजयंतीनिमित्त संगीतमय शिवचरित्र कथेचे आयोजन करण्यात आले असून, या शिवचरित्र कथेचा शुभारंभ सरपंच दिलीप मुसळे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले.

कीर्तनकार मनोहर महाराज सायखेडे यांच्या सुमधुर वाणीतून शिवाजी महाराज यांचा पूर्व इतिहास तसेच शिवाजी महाराजांचा जन्म याविषयीचे अनमोल, असे मार्गदर्शन सायखेडे महाराज यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना केले. या शिवचरित्र कथेमध्ये कथा चालू असताना कथेच्या विषयाला अनुसरून जिवंत देखावे सादर केले जातात.
या कार्यक्र माला योगेश महाराज सायखेडे, शुभम भगत, आदींसह अनेक कलाकार साथ देत आहेत. शिवचरित्र संपल्यानंतर शेवटी कथाप्रवक्ते मनोहर महाराज सायखेडे हे एक झालेल्या कथेच्या आधारावर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना तसेच तरु णांना प्रश्नमंजूषा हा एक छोटासा कार्यक्रम घेत आपले ज्ञान वाढविण्यासाठी संधी देतात. यानंतर आरती व पसायदानाने कार्यक्र माची सांगता करण्यात आली. शाहीर बाळासाहेब भगत यावेळी उपस्थित होते. तरूण पिढी व्यसनाच्या आहारी जात असतानाच या ठिकाणी सर्व व्यसने सोडून या गावातील तसेच परिसरातील तरु ण स्वत:हून या कार्यक्रमात सहभागी होत आहे.