कीर्तनकारांसह वादकांना मिळणार मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:18 AM2021-09-17T04:18:51+5:302021-09-17T04:18:51+5:30
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आल्यानंतर लॉकडाऊन आणि नंतर निर्बंधांमुळे गावागावात निर्बंध कायम असल्याने कीर्तन प्रवचन करणाऱ्यांवर आर्थिक गंडांतर आले आहे. ...
महाराष्ट्रात कोरोनाचे संकट आल्यानंतर लॉकडाऊन आणि नंतर निर्बंधांमुळे गावागावात निर्बंध कायम असल्याने कीर्तन प्रवचन करणाऱ्यांवर आर्थिक गंडांतर आले आहे. कीर्तन, भजन, गायन, भारूड सादर करणारे आणि त्यांना वाद्याची साथ संगत करणाऱ्यांची अडचण झाली आहे. अनेकांची उपासमार हेात आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या मंत्र्यांची वारकरी परिषदेचे संस्थापक विठ्ठलराव पाटील आणि अन्य मान्यवरांनी भेट घेतली आणि गेल्या ८ सप्टेंबर रोजी भेट घेतली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी कीर्तनकार तसेच मृदुंग वादक, पखवाजवादक यांना पाच हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासंदर्भात कीर्तनकारांनी शांताराम महाराज दुसाने यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शिवाजी चव्हाण, भागीरथ कुदळ, गोकुळ महाराज पुंड, नवनान महाराज गांगुर्डे तसेच इंद्रायणी मोरे यांच्या अन्य मान्यवरांनी केले आहे.