निफाडला मुस्लीम समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:05 AM2019-01-04T01:05:33+5:302019-01-04T01:06:33+5:30
निफाड : वक्फ जमिनीवरील अतिक्र मण काढण्याची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तसेच नगर जिल्ह्यातील कर्जत येथील तौसिफ शेख या तरूणाच्या आत्महत्येस जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथील मुस्लीम समाजाच्यावतीने गुरु वारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. येथील जामा मशीदीपासून या मूक मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा शनि मंदिर मार्गे निफाड तहसील येथे आला. या ठिकाणी मोर्चेकºर्यांनी तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन दिले
निफाड : वक्फ जमिनीवरील अतिक्र मण काढण्याची मागणी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने तसेच नगर जिल्ह्यातील कर्जत येथील तौसिफ शेख या तरूणाच्या आत्महत्येस जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी येथील मुस्लीम समाजाच्यावतीने गुरु वारी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.
येथील जामा मशीदीपासून या मूक मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा शनि मंदिर मार्गे निफाड तहसील येथे आला. या ठिकाणी मोर्चेकºर्यांनी तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन दिले.
याप्रसंगी आसिफ पठाण, तौसिफ मन्सुरी, शकील पठाण, हाजी मलंग, अय्यूब हाजी पठाण, हाजी युसूफ शेख, तय्यब शेख, रफीक शेख, अमजद शेख, वसीम शेख, वसीम तांबोळी, दिलावर तांबोळी, हसन शेख, करीम पठाण, मोईन पठाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, कर्जत येथील वक्फ जमिनीवरील अतिक्रमण काढावे यासाठी तौसिफ शेख यांनी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने हे अतिक्र मण न काढल्याने तौसिफ शेख यांनी दि. २० डिसेंबर रोजी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली. या आत्महत्येस प्रशासन जबाबदार असून या अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मयत शेख यांच्या कुटुंबियांना ५० लाख रु पयांची मदत करावी, मयत शेख यांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.