मुस्लीम संघर्ष समितीची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:00 AM2017-09-08T01:00:13+5:302017-09-08T01:00:30+5:30
म्यानमारमध्ये मुस्लिमांवरील अन्याय रोखावा व मानवतेच्या दृष्टीने त्यांचा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
नाशिक : म्यानमारमध्ये मुस्लिमांवरील अन्याय रोखावा व मानवतेच्या दृष्टीने त्यांचा प्रश्न सोडवावा या मागणीसाठी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, म्यानमारच्या सरकारने मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेतले असून, मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू झाल्याने त्यांनी भारतात पलायन करण्यास सुरुवात केली आहे. भारतात आलेल्या मुस्लीम निर्वासितांचा प्रश्न भारत सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून सोडावा व संयुक्त राष्टÑसंघाच्या मदतीने भारताने म्यानमारमध्ये हस्तक्षेप करून मुस्लिमांवरील अन्याय थांबविण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अजीज पठाण, अकिल खान, रफीक शेख, कासिम शेख, अशपाक शेख, इब्राहिम अत्तार, मुक्तार शेख, निजाम शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते निदर्शने आंदोलनात सहभागी झाले होते.