मुस्लीम महिलांनी समाज संरक्षकांना बांधली राखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:33 AM2018-08-26T00:33:07+5:302018-08-26T00:33:23+5:30
समाज ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे, त्यांच्याविषयीची समाजाकडून कृतज्ञता व्यक्त होणे गरजेचे असते. त्यामुळे समाजाच्या रक्षणकर्त्यांनाही अधिक बळ मिळते अन् त्यांचा उत्साह वाढतो. ही जाणीव ठेवत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील मुस्लीम महिलांनी पोलीस, डॉक्टर आणि अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधली.
नाशिक : समाज ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे, त्यांच्याविषयीची समाजाकडून कृतज्ञता व्यक्त होणे गरजेचे असते. त्यामुळे समाजाच्या रक्षणकर्त्यांनाही अधिक बळ मिळते अन् त्यांचा उत्साह वाढतो. ही जाणीव ठेवत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील मुस्लीम महिलांनी पोलीस, डॉक्टर आणि अग्निशामक दलाच्या जवानांना राखी बांधली. आपत्कालीन परिस्थिती उद्भवली की समाजाला तीन घटक प्रामुख्याने आठवतात; मात्र जेव्हा या तीन घटकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते तेव्हा समाजाला विसर पडलेला असतो. समाजाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज राहणाऱ्या आणि अविभाज्य घटक म्हणून समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झटणारे पोलीस, डॉक्टर, अग्निशामक दलाच्या जवानांच्या कार्याकडे दुर्लक्ष करता येणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन प्रभाग १४च्या नगरसेवक समीना मेमन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने या तिन्ही घटकांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील मुस्लीम महिलांसमवेत भद्रकाली पोलीस ठाणे, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, शिंगाडातलाव येथील अग्निशामक दलाचे मुख्यालय गाठून सकाळी तेथील अधिकारी, कर्मचाºयांच्या हातावर राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली आणि समाजाच्या संरक्षणासाठी आम्ही सदैव सज्ज राहून कर्तव्य बजावणार असल्याचे वचनही यावेळी संबंधितांनी महिलांना दिले. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचे नाते अतुट करणारा सण असून, भावाकडून आपल्या रक्षणाचे वचन घेते, असा अप्रत्यक्ष संदेश या सणामागे दडलेला आहे.