मनमाड येथे मुस्लीम महिलांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:06 AM2018-03-18T01:06:29+5:302018-03-18T01:06:29+5:30
मनमाड : केंद्र शासनाने आणलेल्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात मनमाड शहरातील मुस्लीम महिलांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या मार्गदर्शनाखाली मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. सदरचे विधेयक रद्द करण्यात यावे यांसह अन्य मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने संसदेत आणलेल्या तिहेरी तलाकबंदी विधेयकाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील मुस्लीम समाजाच्या महिलांनी येथील जामा मशिदीपासून मूक मोर्चा काढला. ‘तिहेरी तलाक बिल वापस लो, इस्लामी शरिअत हमारा सन्मान है, हम कानून-ए-शरिअत के बाध्य है’ आदी आशयांचे असंख्य फलक हाती घेऊन महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
शहरातील विविध भागातून व प्रमुख मार्गांवरून मोर्चा एकात्मता चौकात पोहचला. येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.मोर्चात सहभागी झालेल्या मुस्लीम महिलांनी यावेळी भर उन्हात बसून निषेध सभेत सहभाग नोंदवला. इस्लामी शरिअत आमचा सन्मान असल्याकडे लक्ष वेधत संसदेत आणलेले ‘तिहेरी तलाकबंदी विधेयक’ केंद्र सरकारने मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. मंडल अधिकारी चौधरी व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.