मालेगावी रोजंदारीवर शिक्षकांची परस्पर नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 11:45 PM2020-03-03T23:45:54+5:302020-03-03T23:48:34+5:30
मालेगाव : महापालिकेच्या शाळांमध्ये नियुक्त असलेल्या शिक्षकांनीच दांडी मारून त्यांच्या जागी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी रोजंदारीने शिक्षकांची परस्पर नियुक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. ३) रोजी उघडकीस आला आहे. पंधरा शिक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त बोर्डे यांनी शिक्षण मंडळाचे आस्थापना विभागप्रमुख किरण सेंगर यांना दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिकेच्या मराठी व उर्दू अशा ८८ शाळा आहेत. शिक्षण मंडळाच्या शाळांमधील शिक्षक स्वत: न शिकविता इतरांना रोजंदारी देऊन शिकवित असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारी मनपा आयुक्त बोर्डे, सहाय्यक आयुक्त आहेर, लोंढे, उपायुक्त नितीन कापडणीस, मुख्य लेखाधिकारी कमरुद्दीन शेख, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी मनपा उर्दू शाळा क्र. १५ येथे भेट दिली. या शाळेवर पाच शिक्षकांची नियुक्ती आहे. मात्र पाचही शिक्षक गैरहजर असल्याचे आढळून आले तर शाळा क्र. २५ येथे सहा पैकी एकच शिक्षक शाळेत दिसून आला. शाळा क्र. ६७ मध्ये चारही शिक्षक गैरहजर आढळून आले तर शाळा क्र. ६९ मध्ये तीन पैकी दोन गैरहजर, शाळा क्र. ८८ मध्ये नियुक्त असलेल्या सहा पैकी दोन गैरहजर आढळून आले.
हा धक्कादायक प्रकार उघड झाल्या प्रकरणाची आयुक्त बोर्डे यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
आयुक्तांच्या अचानक पाहणी दौऱ्यामुळे मनपा शिक्षण मंडळातील शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.अधिकारी फिरकेनामहापालिकेच्या शिक्षण मंडळात पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नियुक्त नाही. सध्या प्रशासन अधिकाºयाचा प्रभारी पदभार ए. डब्ल्यू. चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून चव्हाण हे कार्यालयाकडे फिरकले नाही. लिपिक व इतर कर्मचारीच शिक्षण मंडळाचा कारभार हाकत आहेत.