मविप्र केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 06:05 PM2019-12-21T18:05:30+5:302019-12-21T18:06:16+5:30
लोहोणेर : येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात मविप्र केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
लोहोणेर : येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात मविप्र केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
कार्यक्र माचे उदघाटन मविप्र देवळा तालुका संचालक डॉ. विश्राम निकम, शालेय समिती अध्यक्ष अनिल आहेर, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्या देशमुख, सोमनाथ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक आर. एच. भदाणे यांनी केले. त्यानंतर डॉ. विश्राम निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून संस्थेच्या जनता विद्यालय लोहोणेर सह देवळा व कळवण तालुक्यातील मविप्रच्या शाखेतील एकूण ३९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
सदर स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे -
लहान गट : ५ वी ते ७ वी.
प्रथम : आयुष भामरे, जनता विद्यालय, पिंपळगाव. (वा.), द्वितीय : वैष्णवी मोरे, जनता विद्यालय, रामेश्वर, तृतीय : वैष्णवी पगार, जनता विद्यालय रामेश्वर,
उत्तेजनार्थ : मानसी सोनवणे, कळवण अभिनव.
मोठा गट : ८ वी ते १० वी.
प्रथम : महेश खैरनार, जनता विद्यालय, पिंपळगाव (वा.), द्वितीय : पुजा ढेपले, जनता विद्यालय, देवळा, तृतीय : कल्याणी देशमुख, जनता विद्यालय, पाळे. ऊत्तेजनार्थ : भावेश महाजन, जनता विद्यालय लोहोणेर.
सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम आलेल्या स्पर्धकांची नाशिक येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली असून सदर स्पर्धा दिनांक २४ डिसेंबर २०१९ रोजी नाशिक येथे होणार आहे. स्पर्धेला परीक्षक म्हणून सटाणा महाविद्यालयाचे प्रा. वि. के. पवार व व्ही. बी. राठोड यांनी काम पहिले. कार्यक्र माचे सुत्रसंचालन आभार प्रदर्शन आर. जे. थोरात व एस. बी. एखंडे यांनी केले.