मविप्रवर दोन महिला संचालक घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:18+5:302020-12-06T04:15:18+5:30
पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या सभेसाठी जवळपास तीन हजारांहून अधिक सभासदांनी हजेरी लावली. काही सभासदांना बैठकीची लिंकच दिली ...
पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या या सभेसाठी जवळपास तीन हजारांहून अधिक सभासदांनी हजेरी लावली. काही सभासदांना बैठकीची लिंकच दिली गेली नसल्याचे, तर काहींना तांत्रिक दोषामुळे आपले म्हणणे मांडता आले नसल्याची तक्रार करण्यात आली. या सभेसाठी लिंक न मिळाल्याने सभासद ॲड. नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या आर्किटेक्चर महाविद्यालयाला शरद पवार यांचे, तर कसबे सुकेणे येथील शाळेला कै. मालोजीराव मोगल यांचे नाव देण्याची सूचना केली तसेच संस्थेसाठी मोहाडी येथील जागा खरेदीत अनेक अनियमितता असल्याने यापुढे जागा खरेदी व बांधकामावर निधी खर्च न करण्याची सूचना केली. सुमारे दोन तास चाललेल्या या सभेस अध्यक्ष शेवाळे व सरचिटणीस पवार यांनी सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. बैठकीस सभापती माणिकराव बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, राघोनाना अहिरे, भाऊसाहेब खातळे, अशोक पवार, उत्तमबाबा भालेराव, दत्तात्रय पाटील, नाना महाले आदी संचालक व अधिकारी उपस्थित होते.