राष्ट्रीय महोत्सवात मविप्रचे यश
By admin | Published: October 19, 2015 10:22 PM2015-10-19T22:22:18+5:302015-10-19T22:24:26+5:30
राष्ट्रीय महोत्सवात मविप्रचे यश
नाशिक : दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘पल्स’मध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाने विविध स्पर्धांत यश संपादन केले.
महोत्सवातील समूहगीत स्पर्धेत महाविद्यालयाच्या समूहाने प्रथम पारितोषिक पटकावले. समूहात नम्रता चक्रवर्ती, निशिता पाटील, शिखा अरोरा, आदिती मांगे, संजू अलेक्झांडर, साक्षी घोडगे, ऋतिका पाटील, हर्षिता मुंद, रश्मी नंदा, आकांक्षा अरदवाटिया, सायली, पार्थ, पृथ्वी, रोहन घोष, अनिश मैनी यांचा समावेश होता. प्राध्यापक डॉ. जितेंद्र सिंग यांनी स्वत:देखील ड्रमवादन केले.
करिश्मा सोनवणे, आशुतोष तिवारी यांनी ‘रॅशनल ड्रम थेरपी अॅण्ड कॉम्बिनेशन’ या विषयावर सादर केलेल्या संशोधन संहितेला पहिल्या दहा सर्वोत्तम प्रवेशिकांत स्थान मिळाले. आरोग्यसेवेत कार्यरत वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधांचा वापर करताना घ्यावयाच्या काळजीबद्दल या संहितेत प्रकाशझोत टाकण्यात आला होता. संपूर्ण भारतामधून सहभागी झालेली १४० हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये, दिल्ली विद्यापीठातील ४० अन्य महाविद्यालये व अन्य महाविद्यालयांच्या संघांना टक्कर देऊन नाशिकने हे यश संपादन केले. त्यांना मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, मविप्र रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)