‘ये मेरा दिवानापन हैं’ संगीत मैफलीस दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:06 AM2017-08-29T01:06:58+5:302017-08-29T01:07:05+5:30
‘एक प्यार का नगमा हैं’, ‘एक दिन बीत जाएगा’ या आणि अशा ज्येष्ठ गायक मुकेश यांच्या विविध गाण्यांचे सादरीकरण ‘ये मेरा दीवानापन हंै’ या संगीत मैफलीत करण्यात आले. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे ज्येष्ठ गायक मुकेश यांच्या पुण्यतिथीनिमित्त या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक : ‘एक प्यार का नगमा हैं’, ‘एक दिन बीत जाएगा’ या आणि अशा ज्येष्ठ गायक मुकेश यांच्या विविध गाण्यांचे सादरीकरण ‘ये मेरा दीवानापन हंै’ या संगीत मैफलीत करण्यात आले. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृह येथे ज्येष्ठ गायक मुकेश यांच्या पुण्यतिथीनिमित्त या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
या संगीत मैफलीत ज्येष्ठ गायक विनोद सरदेशमुख आणि अश्विनी जोशी यांनी मुकेश यांची विविध गीते सादर करत आठवणींना उजाळा दिला. संगीत मैफलीत ‘वो सुबह कभी न आएगी’, ‘दिल की नजरसे’, ‘कोई जब तुम्हारा हृदय तोड दे’, ‘बोल मेरे तकदीर मे क्या हंै’ आदी गीतांचे सादरीकरण केले. यावेळी नवीन तांबट (तबला, ढोलकी), मुकुंद चित्ते (आॅक्टोपॅड), आनंद शहाणे (तबला), दीपक तरवडे (सिंथेसायझर) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे निवेदन धनेश जोशी यांनी केले. मुकेश यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे ४०वे वर्ष होते. दरवर्षी २७ आॅगस्ट या दिवशी मुकेश फॅनक्लब, इंदिरानगर, नाशिक यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कारासाठी आवाहन
नाशिक : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाअंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी आवेदन मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना नेहरू युवा केंद्र, प्रणव इमारत दोंदे पुलाजवळ, उंटवाडी येथे उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा समन्वयक भगवान गवई यांनी दिली.