माझे कुटूंब मोहिम आता स्पर्धात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 11:43 PM2020-10-05T23:43:36+5:302020-10-06T01:16:57+5:30
नाशिक- कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने आयोजित केलेली माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेत आता प्रबोधनावर भर देण्यात येणार असून ही मोहिम स्पर्धात्मक करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध प्रबोधन स्पर्धांना पारितोषीके देखील दिली जाणार आहेत.

१५ ते २५ आॅक्टोबर दरम्यान ही मोहिम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सर्व सामाजिक संस्था आणि नागरीकांना सहभागी होता येईल. नागरीकांसाठी निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, मॅसेजेस तसेच आरोग्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तर संस्थांना त्यांच्या कामकाजानुसार बक्षीसे दिली जाणार आहेत. त्यांच्या कार्याचे मुल्यमापन करून त्यांना बक्षीसे देण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात येणार आहे. ही स्पर्धा स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्य, जिल्हा, महानगरपालिका स्तर आणि
आमदारांच्या मतदार संघाच्या स्तरापर्यंत देण्यातत येणा आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकिय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे