माझे कुटूंब मोहिमेत सापडले ३४४ कोरोना बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:14 AM2020-10-02T00:14:36+5:302020-10-02T01:33:11+5:30
नाशिक- राज्य शासनाच्या वतीने कोरोना संदर्भात जागृती करण्याबरोबरच घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करण्यासाठी माझे कुटूब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत २ लाख २९ हजार ९१ नागरीकांची तपासणी करण्यात येत आहेत. या मोहिमेत ६०४ संशयित नागरीक आढळले. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर ३४४ बाधीत रूग्ण आढळले आहे. त्यामुळे ही मोहिम अधिक व्यापक पध्दतीने राबविण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग राज्यातील काही भागात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठकारे यांच्या संकल्पनेतून माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे. नाशिक शहरात महापालिकेच्या वतीने ही मोहिम
राबविण्यासाठी सध्या जोरात मोहिम सुरू आहे. या मोहिमेत आरोग्य नियमांची माहिती संबंधीत घरातील नागरीकांची आरोग्य तपासणी केली जात असून रक्तदाब, हृदयरोग, मधूमेह अशा विकार असलेल्यांची माहिती नोदवली जात आहे. त्यांचे समुपदेशन देखील केले जात आहे. तसेच सर्व माहिती माझे कुटूंब अॅपमध्ये संकलीत केली जात
आहे. याशिवाय ज्या नागरीकांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे आहेत त्या सर्वांचीच तपासणी केल्यानंतर संशयित रूग्णांची कोरोना चाचणी देखील केली जात आहे. या मोहिमेसाठी महापालिकेच्या वतीने ७९४ पथके तयार केली आहेत.
या मोहीमे अंतर्गत ६३२ पथकांनी प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला असून या मोहीमे अंतर्गत ५५ हजार ४१४ घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. या घरांमधील २ लाख २९ हजार ९१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात त्यात कोरोनाची
लक्षणे असलेले ६०४ संशयित आढळले. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यात ३४४ बाधीत आढळले आहेत.
सर्र्वेक्षण कामाला विरोध कायम
महापालिकेने घर सर्वेक्षणासाठी ७९४ पथके तयार केली आहेत. मात्र, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांनी विरोध केला असल्याने पुर्ण क्षमतेने काम सुरू केलेले नाही. सध्या ६३२ पथकेच कार्यरत आहेत. १६२ पथके अद्याप कार्यरत
नसून त्यांनी आरोग्य सुरक्षा किट नाही, अॅँड्रॉईड प्रशिक्षण दिलेले नाही अशी वेगवेगळी कारणे दिली आहेत. त्यामुळे महापालिकेने संबंधीतांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. साथ प्रतिबंधक कायदा तसेच आपत्ती व्यवस्थापन
कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा देणा-या नोटिसा सर्वेक्षणास नकार देणाऱ्यांना बजावण्यात आल्या आहेत.