अजमीर सौंदाणे येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 06:46 PM2020-09-21T18:46:44+5:302020-09-21T18:47:33+5:30
औंदाणे : कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची सुरुवात अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथे करण्यात आली.
ठळक मुद्देगावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचे चार गट
औंदाणे : कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची सुरुवात अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथे करण्यात आली.
ही मोहीम राबविण्याची सूचना ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आली असून, गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचे चार गट करण्यात आले आहेत. ते गावातील प्रत्येक कुटुंबात जाऊन ताप व आॅक्सिजन लेव्हलची तपासणी करण्यात येईल. सरपंच धनंजय पवार, उपसरपंच भूषण पवार, सदस्य दीपक शेवाळे, डॉ. महाजन, अण्णा सोनवणे, राजेंद्र पवार, लीलाधर विधाते आदी उपिस्थत होते.