’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्र माचा बागलाणमध्ये प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:23 PM2020-09-18T21:23:10+5:302020-09-19T01:19:08+5:30
सटाणा : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सुरु केलेल्या ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्र माचा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते चौंधाणे येथून शुभारंभ करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सोनवणे यांनी दिली.
सटाणा : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सुरु केलेल्या ’माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्र माचा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते चौंधाणे येथून शुभारंभ करण्यात आला. आरोग्य विभागाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सोनवणे यांनी दिली. यावेळी आरोग्य विभागाच्या पथकास आॅक्सी मीटर, थर्मामीटर, टेंपरेचर गन, सॅनिटायझर, ग्लोव्ह्ज व मास्कचे वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. सरपंच लीलाबाई मोरे, उपसरपंच नंदू मोरे, माजी सरपंच राकेश मोरे, केदा मोरे, ग्रामसेवक निंबा वाघ, बिंदू शर्मा, डॉ. शेखर मुळे, संदीप खैरनार, भाऊसाहेब भदाणे आदी उपस्थित होते.