माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पथकांची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:23+5:302021-05-01T04:13:23+5:30
सटाणा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सटाणा नगर परिषद तसेच शिक्षक यांच्या मार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी या विशेष ...
सटाणा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सटाणा नगर परिषद तसेच शिक्षक यांच्या मार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी या विशेष उपक्रमांतर्गत शहरात २ मेपर्यंत विशेष आरोग्य सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी सटाणा नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक यांचा या सर्वेक्षण पथकात समावेश करण्यात आला आहे.
कोरोना प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांचे लवकर निदान झाले तर त्यांच्यावर लवकर उपचार करता येतील. प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांचे आरोग्य सर्वेक्षण करण्याचे काम या उपक्रमात हाती घेण्यात आले आहे. अनेक रुग्ण दवाखान्यात भरती होत असतानाच त्यांची ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षाखाली आलेली असते. एचआरसीटी स्कोअरही वाढलेला असतो. रुग्णांना वेळेवर औषधांचा पुरवठा करणे अत्यंत जिकरीचे आणि जोखमीचे झाले आहे. त्यामुळे लवकर निदान, लवकर उपचार घेऊन शहरातील नागरिकांचा कोरोना साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवून मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य सर्वेक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक पथकातील कर्मचारी दररोज ५० कुटुंबाचे सर्वेक्षण करतील. तसेच नागरिकांना काही कोविडसदृश लक्षणे आढळल्यास त्यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधून तपासणी व उपचार करावा तसेच सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकास खरी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी हेमलता डगळे-हिले यांनी केले आहे.
फोटो - ३० सटाणा१
सटाणा नगरपरिषदेच्या सर्वेक्षणअंतर्गत महिलांची तपासणी करताना पथक.
===Photopath===
300421\30nsk_3_30042021_13.jpg
===Caption===
सटाणा नगरपरिषदेच्या सर्वेक्षण अंतर्गत महिलांची तपासणी करताना पथक.