डोंगरगाव येथे माझे कुटुंब-माझी जबाबदारी उपक्र माला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 06:08 PM2020-09-20T18:08:43+5:302020-09-20T18:11:11+5:30
मेशी : कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र माला देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे सुरूवात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेशी : कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्र माला देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे सुरूवात करण्यात आली.
मेशी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत या उपक्र मास सुरूवात झाली. टप्प्या टप्प्यात पुर्ण गावातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. यावेळी सरपंच दयाराम सावंत, उपसरपंच सत्यभामा सावंत, परिचारिका अर्पणा बागुल, आशा वर्कर स्वाती कुलकर्णी, संगणक परिचालक देवाजी सावंत, ग्रामसेवक सतीश मोरे, पुंडलिक सावंत, एकनाथ सावंत, किसन गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच दयाराम सावंत यांनी गावातील सर्व नागरिकांनी आपली आण िकुटूंबाची तपासणी करून घ्यावी तसेच कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.