येवल्यात नामदेव शिंपी समाजाचा माझे कुटुंब, माझी जनगनना उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 07:32 PM2020-10-05T19:32:31+5:302020-10-06T01:06:26+5:30
येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्या वतीने माझे कुटुंब, माझी जनगनना उपक्र म राबविला जात आहे. शहरातील शिंपी गल्ली येथे झालेल्या समाज बैठकीत मान्यवरांच्या हस्ते जनगनना उपक्र माचे मोफत नोंदणी फॉर्म वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.

प्रारंभी श्री संत नामदेव महाराज प्रतिमेला जानकीराम शिंदे,रमाकांत खंदारे, जयवंत खांबेकर, नंदु लचके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहर परिसरात मी नामदेव शिंपी, माझे कुटुंब माझी जनगनना २०२०-२१ या उपक्र म संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समिती अध्यक्ष मुकेश लचके यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने घरोघरी जाऊन हा उपक्र म राबविला जात आहे.
यावेळी समाजबांधवांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियमीत मास्क लावा, स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेण्याबाबत जनजागृतीही केली जात आहे.
या प्रसंगी उपाध्यक्ष राम तुपसाखरे, कार्यवाहक राजेंद्र कल्याणकर, उपकार्यवाहक पांडुरंग खंदारे, खजिनदार कवित माळवे, संघटक अमोल लचके, संघटक तुषार भांबारे, उपसंघटक सागर खंदारे, उपसंघटक भुषण लचके, पंकज शिंदे, सुनिल टिभे, अमीत हाबडे, सचिन भांबारे, प्रमोद लचके, योगेश लचके, वरद लचके, राज लचके आदी उपस्थित होते.