कार अपघातात माय-लेक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 14:49 IST2020-03-30T14:47:23+5:302020-03-30T14:49:10+5:30
जळगाव नेऊर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर येथील वनारसी नाल्याजवळ इंडीगो कारच्या भीषण अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत.

कार अपघातात माय-लेक ठार
जळगाव नेऊर : नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर येथील वनारसी नाल्याजवळ इंडीगो कारच्या भीषण अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत. केसावर भांडे विकण्याचा व्यवसाय असलेले जाधव कुटुंब आपल्या इंडिगो कार क्र मांक एमएच १५ बीडी ३९०६ या कारने नाशिक येथून आपल्या मुळ गावी बिडकीन ता. पैठण कडे जात होते. यावेळी गाडीत चालकासह पाच प्रवासी होते. नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील जळगाव नेऊर येथील वनारसी नाल्याजवळ पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कारचे टायर फुटले. भीषण अपघात होऊन कार पुलाच्या संरक्षक जाळीत घुसली. या अपघातात गीता विनोद जाधव (२८) आणि विराज विनोद जाधव (४) या माय -लेकाचा जागीच मृत्यू झाला. कार चालकासह तिघेजण किरकोळ जखमी झाले. जखमींवर येवल्यातील रूग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र पठाडे, दराडे, पिसाळ, गडाख आदी अधिक तपास करत आहे.