माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही, अंजली दमानियांनाही स्पष्टच सांगितलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:17 AM2021-09-11T04:17:05+5:302021-09-11T07:23:11+5:30
पुन्हा निवडणुका येतील, त्यात लोकांच्या प्रश्नावर पुन्हा आवाज उठविण्यात येईल. जनताही आता सारे काही जाणून असून, नोटाबंदी, नोकऱ्यांचे खोटे ...
पुन्हा निवडणुका येतील, त्यात लोकांच्या प्रश्नावर पुन्हा आवाज उठविण्यात येईल. जनताही आता सारे काही जाणून असून, नोटाबंदी, नोकऱ्यांचे खोटे आश्वासन, जीएसटीतून पिळवणूक, अशा साऱ्या प्रश्नांवर जनता उघडपणे काही बोलत नसली तरी, मतपेटीतून ती निश्चित बोलेल, असे सांगून राजकीय व्यासपीठावर जे मला योग्य वाटेल ते बोलेलच, त्यासाठी कोणाची पर्वा करणार नाही, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. किरीट सोमय्या यांनी नाशकात येऊन केलेल्या पाहणीतून काहीच निष्पन्न झाले नाही. तो शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार होता, अशा शब्दांत टीका केली.
चौकट
...तर उजळ माथ्याने बाहेर येऊ
महाराष्ट्र सदनप्रकरणी न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर अंजली दमानिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर बोलताना भुजबळ यांनी, लोकशाही असल्यामुळे कोणीही कोर्टात जाऊ शकते. त्यामुळे दमानिया यांनी हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जावे, तेथे आम्ही आमची बाजू मांडूच; परंतु हे नक्की की, तेथूनही आम्ही आणखी उजळ माथ्याने बाहेर येऊ.