मिठसागरे येथे बंधाऱ्यात बुडून मायलेकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:00 AM2020-02-21T02:00:59+5:302020-02-21T02:01:50+5:30
सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथे मेंढ्या चारणाºया मायलेकाचा जाम नदीच्या पात्रात असलेल्या बंधाºयात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२०) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.
सिन्नर : तालुक्यातील मिठसागरे येथे मेंढ्या चारणाºया मायलेकाचा जाम नदीच्या पात्रात असलेल्या बंधाºयात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२०) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.
मिठसागरे येथील पिंट्याबाई बाळू राऊत (३९) व त्यांचा मुलगा गोविंद (१७) हे मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. मेंढ्यांना बंधाºयात पाणी पाजल्यानंतर गोविंद हा कपडे काढून बंधाºयाच्या पात्रात आंघोळीसाठी गेला, तर आई मेंढ्या चारत होती. खोलीचा अंदाज न आल्याने गोविंद बुडू लागला. त्यामुळे आई त्याच्या मदतीला धावली. मात्र मुलाला वाचवितांना त्यापण बंधाºयात बुडाल्या. या घटनेत दोघांचाही दुर्दैवी अंत झाला.
गरीब मेंढपाळ कुटुंबातील मायलेकाचा बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांकडून शोध
मेंढ्या चरत चरत जवळच्या कांद्याच्या शेतात गेल्या, त्यामुळे शेतकरी जनावरे कोण चारत आहे पाहण्यासाठी आला. मात्र मेंढ्यांच्या पाठीमागे कोणी नसल्याने शोधाशोध सुरू झाली. संबंधित शेतकºयाने ज्यांच्या मेंढ्या आहेत त्या गोविंद राऊत याला फोन लावला; पण प्रतिसाद मिळाला नाही. परिसरातील शेतकºयांनी शोध घेतल्यानंतर बंधाºयाजवळ कपडे व मोबाइल आढळून आला. तातडीने बंधाºयात शोध घेण्यात आला असता मायलेकाचे मृतदेह आढळून आले.