टिंगरी येथे छत कोसळून मायलेकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:50 AM2017-10-18T00:50:09+5:302017-10-18T00:50:14+5:30
तालुक्यातील टिंगरी येथे घराचे छत कोसळल्याने मातीच्या ढिगाºयाखाली दबून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक वर्षाच्या चिमुकलीचे दैव बलवत्तर असल्याने तिला ढिगाºयाखालून ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले.
मालेगाव : तालुक्यातील टिंगरी येथे घराचे छत कोसळल्याने मातीच्या ढिगाºयाखाली दबून मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एक वर्षाच्या चिमुकलीचे दैव बलवत्तर असल्याने तिला ढिगाºयाखालून ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास टिंगरी येथील घराचे छत कोसळले. यात मालतीबाई दामू सोमवंशी (६०) व समाधान दामू सोमवंशी (३४) यांचा मातीच्या ढिगाºयाखाली दबून मृत्यू झाला. घटना घडताच ग्रामस्थांनी मातीचा ढिगारा उपसण्यास सुरुवात केली. गेल्या आठवड्यात टिंगरी परिसरात मुसळधार
पाऊस झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती; मात्र भिज पावसामुळे घरांचे मोठे नुकसान झाले होते. सोमवंशी यांचे घर मातीचे असल्यामुळे अचानक कोसळले. ऐन दिवाळी सणातच टिंगरीला ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोमवंशी यांचे गावातच वर्कशॉप आहे.
यावेळी सरपंच नंदू सोमवंशी, सुनील बोरसे, मदन सपकाळ, विजय अहिरे व ग्रामस्थांनी मदत कार्य केले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. तसेच मंडल अधिकाºयांनी घटनेचा पंचनामा केला.
चिमुकली वाचली
टिंगरी येथे घराचे छत कोसळल्यानंतर मातीच्या ढिगाºयाखाली पाळण्यात असलेली चिमुकलीही दबली गेली होती. मात्र ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केल्याने ती सुखरूप बाहेर निघाली. तिची आई मनीषा समाधान सोमवंशी या घराबाहेर असल्यामुळे वाचल्या आहेत.