रहस्यप्रधान ‘माय डिअर शुबी’

By admin | Published: November 22, 2015 11:55 PM2015-11-22T23:55:25+5:302015-11-22T23:57:14+5:30

राज्य नाट्य : ‘नड नड कानडे’ नाटकही सादर

Mysterious 'My Dear Shubi' | रहस्यप्रधान ‘माय डिअर शुबी’

रहस्यप्रधान ‘माय डिअर शुबी’

Next

नाशिक : ‘त्या’ घरात मृतदेह असल्याचा सीआयडी अधिकाऱ्याला फोन येतो... तपासासाठी तो घरीही पोहोचतो; पण त्या घरातल्या गूढ वातावरणाने रहस्य अधिकच गडद होत जाते आणि ते रसिकांना अखेरपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवते...
राज्य नाट्य स्पर्धेत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आर. एम. ग्रुपच्या वतीने ‘माय डिअर शुबी’ हे रहस्यप्रधान नाटक आज सायंकाळी सादर झाले. निरंजन मार्कंडेयवार लिखित या नाटकाचे दिग्दर्शन व प्रमुख भूमिका प्रशांत हिरे यांची होती. निर्जन वस्तीतल्या एका घरात साळगावकर नामक महिला आपल्या तान्ह्या मुलीसोबत राहत असते. तिच्या घरी मृतदेह असल्याचा फोन सीआयडी अधिकाऱ्याला येतो. चौकशीसाठी घरी पोहोचल्यानंतर त्याला स्वयंपाकघरात मेलेले मांजर आढळून येते. तिथून कथेतील गुंता वाढत जातो. नेमका खून कोणाचा होतो, महिलेच्या विक्षिप्त वागण्याचे कारण काय, मांजराचे रहस्य काय, या गोष्टी रसिकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवतात. लक्ष्मी पिंपळे, अस्मी राजेश यांच्या भूमिका होत्या. नेपथ्य गणेश सोनवणे, प्रकाशयोजना रवि रहाणे, संगीत रोहित सरोदे, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा मानसी शुक्ल, आर्या प्रशांत, नृत्य दिग्दर्शन श्रीकांत वाखारकर यांचे होते.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात संकर्षण युवा फाउंडेशनच्या वतीने नड नड कानडे हे हरीश जाधव लिखित व विजय दीक्षित दिग्दर्शित नाटक सादर झाले. विनोदाच्या अंगाने जाणारी, पण रहस्यमय वळणे घेणारी कथा त्यात सादर करण्यात आली. सुभाष व सुहास या दोन भावांपैकी सुभाषचा खून होतो. एक इसम सुहासकडे येऊन सुभाषने आपल्याकडून चार लाख रुपये घेतल्याचे सांगतो. तशी चिठ्ठीही सादर करतो. सुभाषचा खून कोण करतो, हे रहस्य नाटकात शेवटी उलगडते. गणेश सरकटे, अजय तारगे, अमित रेलकर, अक्षता संन्याशिव यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रकाशयोजना ईश्वर जगताप, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा अविनाश पोळ यांची होती.
-: आजचे नाटक : -
या वळणावर
(मेनली अमॅच्युअर्स, नाशिक)
वेळ : सायंकाळी ७

Web Title: Mysterious 'My Dear Shubi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.