नाशिकमध्ये रेल्वेचा कारखाना होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:30 AM2017-07-31T01:30:29+5:302017-07-31T01:30:43+5:30
गुंतवणुकीसाठी नाशिकमध्ये क्षमता असतानाही नवीन उद्योग येत नसल्याने चिंतेचे वातावरण असताना, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नाशिकमध्ये रेल्वेचा कारखाना सुरू करण्याची घोेषणा केली आहे. त्यामुळे नाशिकला मोठी उपलब्धी होणार आहे. त्याचबरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला नाशिकमध्ये थांबा देण्यास अनुकूलता दर्शविली आहे.
नाशिक : गुंतवणुकीसाठी नाशिकमध्ये क्षमता असतानाही नवीन उद्योग येत नसल्याने चिंतेचे वातावरण असताना, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नाशिकमध्ये रेल्वेचा कारखाना सुरू करण्याची घोेषणा केली आहे. त्यामुळे नाशिकला मोठी उपलब्धी होणार आहे. त्याचबरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला नाशिकमध्ये थांबा देण्यास अनुकूलता दर्शविली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मेळा बसस्थानकाचे विमानतळाच्या धर्तीवर नूतनीकरण करण्यात येणार असून, या बस पोर्टचे भूमिपूजन रविवारी सायंकाळी झाले. यावेळी सुरेश प्रभू यांनी नाशिकच्या उद्योग क्षेत्राला झळाळी देणारी घोषणा केली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनीही घोषणांचा वर्षाव केला. नाशिकमध्ये यापूर्वी रेल्वे नीर आणि अन्य काही प्रकल्पांच्या घोषणा झाल्या होत्या. मात्र राष्टÑीय स्तरावर प्रकल्प पळवापळवीमुळे प्रकल्प नाशिकला होऊ शकला नव्हता. आता मात्र कर्षण कारखान्याचे विस्तारीकरण करून तेथे नवीन प्रकल्प साकारला जाणार आहे. नाशिकचे वातावरण गुंतवणुकीसाठी चांगले आहे. येथे अनेक उद्योग आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये रेल्वेचा नवा कारखाना सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मंजूर केला असून, आर्थिक तरतुदीची प्रक्रिया करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकचे महत्त्व राज्यात खूप असून, मुंबईतील नागरिकांना नाशिकचा भाजीपाला मिळत असतो. त्यामुळे आता मुंबईच्या रेल्वेस्थानकावर नाशिकच्या शेतकºयांच्या भाजीपाला विक्रीची व्यवस्था करणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
नाशिकला केवळ कारखानाच नव्हे तर मुंबई-अहमदाबाद या बहुचर्चित बुलेट ट्रेनला नाशिकला थांबा मिळणार आहे. सुरुवातीला हा थांबा देण्याचे ठरले होेते, परंतु नंतर मात्र सर्वेक्षणात नाशिक वगळण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. रविवारी झालेल्या
अडीच तासात जेएनपीटीला पोहचणे शक्य
मुंबई-नागपूर हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्या माध्यमातून नाशिकचा औद्योगिक आणि शेतमाल अवघ्या दोन ते अडीच तासात जेएनपीटी येथे पाठविला जाणे शक्य आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचा सर्वाधिक फायदा नाशिकलाच होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारच्या माध्यमातून नाशिकला ड्रायपोर्ट स्थापन केले जाणार आहे. त्यातच समृद्धी मार्ग झाला, तर नाशिक जेएनपीटीला (नेहरू पोर्ट ट्रस्ट) जोडले जाणार आहे. त्याचा फायदा नाशिकला होणार असून, अवघ्या दोन ते अडीच तासात माल पोहोचू शकेल, असे त्यांनी सांगितले.