नाशिकरोड परिसरातील पाच होर्डिंग्ज हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:37 AM2017-07-29T01:37:45+5:302017-07-29T01:37:45+5:30
दत्तमंदिर सिग्नलजवळील देहबानू कॉम्प्लेक्स येथे १० बाय २० आकाराचे होर्डिंग उभारण्यात आलेले होते. जाहिरात कर थकबाकी पोटी सोमवारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या साह्याने सदर होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले.
नाशिकरोड : मनपा प्रशासनाकडून दत्तमंदिर सिग्नलजवळील एक व सिन्नरफाटा येथील चार असे एकूण थकबाकी असलेले पाच होर्डिंग्ज जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करून त्यांचे लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले, तर तीन पेट्रोल पंपाजवळ लावलेल्या होर्डिंगवरील जाहिराती पोटी तीन लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
दत्तमंदिर सिग्नलजवळील देहबानू कॉम्प्लेक्स येथे १० बाय २० आकाराचे होर्डिंग उभारण्यात आलेले होते. जाहिरात कर थकबाकी पोटी सोमवारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या साह्याने सदर होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले. तसेच सिन्नरफाटा येथे उड्डाण पुलावरून उतरताना डाव्या बाजूला २० बाय ४० आकाराचे दोन होर्डिंग मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आले, तर त्यापुढील आणखी दोन २० बाय ४० आकारांचे दोन होर्डिंग्ज बुधवारी दुपारी जमीनदोस्त करण्यात येऊन होर्डिंगचे सर्व लोखंडी साहित्य, अॅँगल, पोल जप्त करण्यात आले. या होर्डिंगचालकांकडे एकूण आठ लाख रुपयांची थकबाकी होती, तर खान, लाहोटी व थोरात पेट्रोलपंप या ठिकाणी असलेल्या जाहिरात होर्डिंगची एकूण तीन लाख दोन हजार शंभर रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आल्याचे मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी सांगितले.