नाशकात पावसाची दिवसभर विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:01 AM2017-07-26T01:01:55+5:302017-07-26T01:02:08+5:30

नाशिक : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतली असून, धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली आहे.

naasakaata-paavasaacai-daivasabhara-vaisaraantai | नाशकात पावसाची दिवसभर विश्रांती

नाशकात पावसाची दिवसभर विश्रांती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी दिवसभर विश्रांती घेतली असून, धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरल्याने धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करण्यात आली आहे. पाऊस थांबल्याने शेतकऱ्यांनाही हायसे वाटले आहे. सोमवारी तुरळक हजेरी लावलेल्या पावसाने मंगळवारी पूर्ण विश्रांती घेऊन नागरिकांना सूर्यदर्शन घडविल्याने सर्वत्र आल्हाददायक वातावरण तयार झाले. त्यामुळे जनजीवनही सुरळीत पार पडले. गेल्या चार दिवसांपासून पावसाने संततधार लावल्यामुळे नद्या, नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली तसेच धरणांच्या पाणी साठ्यातही कमालीची वाढ झाल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी धरणातून नदीपात्रात पाणी सोडावे लागले. जिल्ह्यातील धरणांमध्ये ६१ टक्के पाणी साठा असून, त्यातील गंगापूर, दारणा, कादवा, वालदेवी, आळंदी या धरणांतून पाणी सोडण्याची वेळ आली होती. परंतु पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे मंगळवारी मोठ्या प्रमाणात पाण्यात कपात करण्यात आली. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्णात फक्त १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत फक्त जेमतेम २६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या तालुक्यात भात लावणीला वेग आला असून, अतिवृष्टी व पावसाच्या संततधारेमुळे दुबार पेरणीचे संकट कोसळते की काय, अशी भीती बाळगणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गंगापूरचे पाणी थांबवले
सोमवार दुपारनंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यामुळे गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी मंगळवारी रात्री ८ वाजता बंद करण्यात आले आहे. सध्या गंगापूर ७५ टक्के इतका पाणीसाठा असून, संपूर्ण धरण समूहात ८१ टक्के पाणी साठले आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी बंद करण्यात येत असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.

Web Title: naasakaata-paavasaacai-daivasabhara-vaisaraantai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.