एनडीआरएफ जवानांकडऊन आपत्तीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 07:47 PM2019-08-01T19:47:22+5:302019-08-01T19:49:57+5:30

नाशिक : आपत्तीच्या काळात परिस्थिती मध्ये स्वत:चा बचाव कसा करावा आणि पूर परिस्थिती उद्भवल्यास घरामध्ये असलेले साधन-सामुग्रीचा वापर कसा ...

naashik, disaster,lessons,from,ndrf,personnel | एनडीआरएफ जवानांकडऊन आपत्तीचे धडे

एनडीआरएफ जवानांकडऊन आपत्तीचे धडे

Next


नाशिक: आपत्तीच्या काळात परिस्थिती मध्ये स्वत:चा बचाव कसा करावा आणि पूर परिस्थिती उद्भवल्यास घरामध्ये असलेले साधन-सामुग्रीचा वापर कसा करावा आदिंचे प्रात्यिक्षक करून दाखविण्यात आले. यामध्ये बांबूचा वापर, रिकामे तेलाचे डबे, थर्मकोल, यापासून पाण्यावर तरंगणारे उपकरणे कशी तयार करावी याचेही प्रात्यिक्षक करून दाखवण्यात आले. सोबत आपत्तीचे प्रकार आपत्ती कोणत्या कोणत्या स्वरूपाचे असतात याबद्दल माहिती देण्यात आली इंडिया एन.डी.आर.एफ. देशात आलेल्या आपत्ती ला सामोरे जाण्यासाठी कशा पद्धतीने मदत करते याबाबत माहिती डेप्युटी कमांडंट शिव कुमार यांनी दिली.

कनाशी येथील प्राथमिक व माध्यमिक शाळा शिक्षक तसेच ज्युनिअर कॉलेज येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर पथकाचे प्रमुख डेप्युटी कमांडंट शिव कुमार यांच्या नेतृत्वाखाली मनोज कुमार हे मार्गदर्शन करीत आहे. या टिममध्ये एकूण ३२ सदस्य आहेत. याप्रसंगी विद्यार्थी, प्राचार्य, सरपंच, पोलीस पाटील , तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी तसेच नागरिक या कार्यशाळेस उपस्थित होते.कनाशी मधील आश्रम शाळेमध्येही मुलींना आपत्ती विषयक माहिती देऊन आपत्ती ओढवल्यास कसा प्रतिसाद द्यावा, शालेय आपत्ती व्यवस्थापन आराखडा कसा असावा आणि रंगीत तालीम कशी घ्यावी याबाबत सखोल माहिती देण्यात आली मुलींनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.
कनाशी येथे पार पडलेल्या कार्यशाळस प्रमुख पाहुणे म्हणून कळवण तहसीलदार उपस्थित होते. कार्यशाळेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे शोध व बचाव पथकाचे दहा सदस्य उपस्थित होते.

 

 

 

Web Title: naashik, disaster,lessons,from,ndrf,personnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.