मॅरेथॉन मध्ये नाचलोढीचा दबदबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 05:20 PM2018-12-24T17:20:47+5:302018-12-24T17:30:17+5:30
कसबे सुकेणे : येथील छत्रपती शिवाजी महाराज संस्कृतिक कला व क्र ीडा मंडळ आणि सुंदरी क्रि केट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव पिहलवान जाधव क्र ीडा महोत्सवास प्रारंभ झाला असून येत्या बुधवारी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार रंगणार आहे. अशी माहिती संयोजक बाळासाहेब जाधव व उपसरपंच छगन जाधव यांनी दिली.
कसबे सुकेणे : येथील छत्रपती शिवाजी महाराज संस्कृतिक कला व क्र ीडा मंडळ आणि सुंदरी क्रि केट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव पिहलवान जाधव क्र ीडा महोत्सवास प्रारंभ झाला असून येत्या बुधवारी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार रंगणार आहे. अशी माहिती संयोजक बाळासाहेब जाधव व उपसरपंच छगन जाधव यांनी दिली.
गेल्या सात वर्षांपासून कसबे सुकेणे येथे राज्यपातळीवरील क्र ीडा महोत्सव होत असून क्रि केट, कब्बडी, मॅरेथॉन आणि उत्तर महाराष्टÑ केसरी किताब कुस्ती हे प्रमुख आकर्षण आहे. स्वर्गीय माधवराव जाधव पहिलवान चषक क्रि केट स्पर्धेसाठी राज्यभरातील नामवंत संघ सहभागी होत असून प्रथम पारितोषिक ३१ हजार, व्दितीय २१ हजार, तृतीय ११ हजार तर चतुर्थ ७ हजार रु पये तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक व सामनावीर या गटातही मोठ्या प्रमाणात बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
येत्या बुधवारी (दि.२६) उत्तर महाराष्टÑ केसरी कुस्ती स्पर्धा होत असून कुमार, वरिष्ठ व महिला गटात या स्पर्धा होत आहे. स्वर्गीय माधवराव पहिलवान उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २१ हजार व गदा तर द्वितीय पारितोषिक ११ हजार रु पये आहे. याशिवाय प्रत्येक वजनी गटात प्रथम, व्दितीय बक्षिसे दिली जाणार आहे. या निमित्ताने छत्रपती राजे संभाजी महाराज मैदान गजबजले असून प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी खास आसनव्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
मॅरेथॉनचा शुभारंभ कसबे सुकेणे झाला. जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, बाळासाहेब जाधव, भाऊराज उगले, लक्ष्मण काळे, विश्वास भंडारे, अशोक भंडारे, संतोष काळे, संतोष प्रसाद, अमोल उगले, संतोष भालेराव, विजय भालेराव, संदीप वाळवे, सतीश बोंबले, सुनील गोटरने, पद्माकर पिंगळ, अनिल जाधव, विजय जाधव, राजेंद्र भंडारे, चिंतामण जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
मॅरेथॉन मध्ये नाचलोढी चा दबदबा
क्रीडा महोत्सव शुभारंभ जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेने झाला. बसस्थानक चौकातून सुरु झशलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत नाचलोढी येतील धावपटूचा प्रत्येक गटात दबदबा कायम राहिला, तर मॅरेथॉन इगतपुरीच्या कमळु कल्लू लोते याने सात किलोमीटर अंतर २२ मिनिटे ५ सकंदात पार करीत जिंकली.
१४ वर्ष मुलांच्या गटात नाचलोढीचे सुरेश चौधरी (प्रथम), अनिल चौधरी (व्दितीय) तर अजय यादव-घनशेत (तृतीय), याच गटात मुलींमध्ये नाचलोढीची भारती चौधरी (प्रथम), सानिका चौधरी (द्वितीय) तर रेखा शिंगाडे (तृतीय), १६ वर्ष गटात मुलांमध्ये वसंता चौधरी (प्रथम), संदीप चौधरी व्दितीय), रवींद्र चौधरी- तृतीय) सर्व नाच लोढी, याच गटात मुलींमध्ये रविना चौधरी (प्रथम), कावरी सहारे (व्दितीय) दीक्षा शिताड (तृतीय), सात किलोमीटर खुल्या वयोगटात मुलांमध्ये कमळु कल्लू लोते-मालोजेवाडी ता. इगतपुरी (प्रथम), दिनकर गुलाब महाले - गणेशगाव (त्र्यंबकेश्वर) (व्दितीय) तर रोहिदास किसन भोंबे - नाचलोढी (तृतीय). मुलींच्या खुल्या गटात ३ किलोमीटर मध्ये सुशीला चौधरी (प्रथम), वनिता झोंबे (व्दितीय) सरस्वती चौधरी ( तृतीय) - सर्व नाचलोढी यांनी यश मिळविले.